My Stories

ज्ञान दान

*ज्ञान दान*

डॉ. बाबासाहेबांची जयन्ती केली हैप्पी वाली फिलिंग पद्धतीने.

१४ एप्रिल तारखेचे एक वेगळेच महत्व आहे कारण याच तारखेला जन्म झाला होता एका महान युगपुरुषाचा, ज्यांनी खूप मोठा इतिहास घडवला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वतंत्र भारताताच्या एकंदरीत इतिहासातील योगदान आपल्या सगळ्यांना चांगलेच माहित आहे, बाबासाहेबांना वाचनाची, शिक्षणाची विलक्षण आवड. त्यांनी ज्ञानाच्या भुकेसमोर कधीच पोटाच्या भुकेला महत्व दिले नाही. शिका आणि शिकू दया हा त्यांनी घेतलेला ध्यास तरुणांच्या मनात अजूनही घर करून आहे.
तर एकंदरीत अश्या अभ्यासू ज्ञानी महापुरुषाची जयंतीही तितकीच खास आणि हैप्पी वाली फिलिंग पद्धतीत करायचा निर्धार पक्का झाला.

बाबांनी मुलांनी शिकावे यावर विशेष भर दिला होता, त्यांचा हाच विचार आपल्या उपक्रमात आम्ही मांडला. मी माझ्या संपूर्ण टीम सोबत विचारविनिमयाने प्रोजेक्ट ज्ञान दान ची बांधणी केली. या प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही आमच्या मित्रपरिवार मंडळींकडून त्यांनी वाचून झालेली पण त्या नंतर घरात पडून असलेली पुस्तके गोळा करून ती अनाथाश्रमातील चिमुकली तसेच वस्तीमधील गरजू लहान मुलांच्या हाती पोहोचवण्याचा निश्चय पक्का केला. आणि निश्चयानुसार लागलो कामाला,या कामात सोशिअल माध्यम म्हणजेच फेसबुक, व्हाट्सअप, युट्युब याचा मोलाचा उपयोग झाला. विविध पोस्टमधून टीम हैप्पी वाली फिलिंगने लोकांना निवेदन केले कि जास्तीत जास्त सहभाग घेऊन प्रत्येकाने पुस्तकरूपी ज्ञान दान करावे. आणि विशेष म्हणजे या उपक्रमाला मुबंई, नवीन मुबंई सोबत पूणे, सोलापूर तसेच शेगाव इथूनही खूप चांगला प्रितसाद लाभला. पुणेकरांचे खास कौतुक, त्यांनी वैयक्तिक येऊन जमलेली पुस्तके माझ्या हाती सोपवली. ज्ञान दानाच्या उपक्रमात बरेच मदतीचे हात पुढे सरसावले आणि बघता बघता आम्ही पुस्तक वाटपाच्या एक दिवस आधी पर्यंत शंभर पुस्तकांचा आकडा गाठला. माझ्या पूणे येथील प्रतिनिधींचा रात्री फोन आला बाबांची एकशे अठ्ठाविसावी जयंती, जमत असेल तर आपण १२८ पुस्तके वाटू. तसा विचार खूप चांगला होता पण त्याची पूर्तता करण्यासाठी अठ्ठावीस पुस्तके कमी पडत होती, ती आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी विकत घ्यायची ठरवली. सकाळी उठून त्याच कामासाठी मी निघालो तोच इमारतीच्या गेट वर आमच्या सेक्युरिटी मामांनी मला आडवले आणि माझ्या हातात एक पिशवी सोपवली, त्यात विस पुस्तके होती. मामा म्हणाले गेला आठवडा तुमची धावपळ पाहतोय, तुम्ही गरजू पोरांना पुस्तकं वाटणार हे मला कळाले आणि मी आमच्या चाळीतून माझ्याकडून जमली तितकी पुस्तकं गोळा करून आणलेत. त्यावेळेला मी मामांना आणि त्या पिशवीला फक्त्त एकटक निशब्द होऊन पाहत होतो, मला कळतच नव्हतं कि त्यांचे आभार कसे मानावे. तोंडातून शब्द फुटत नव्हते, भारावून मी मामांना घट्ट मिठी मारली आणि राहिलेली आठ पुस्तके विकत घेऊन आलो.

ठरल्याप्रमाणे आम्ही नियोजित वेळेत कोपरखैरणे येथील जनविकास सोसायटी बालक आश्रमाला भेट दिली, तिथल्या मुलांना आम्ही पुस्तकरुपी ज्ञान दान केले. मुलं खूप जास्त आनंदी झाली. त्यांनी लगेचच आमच्या समोरच पुस्तकं वाचन सुरू देखील केले, एक वेगळेच समाधान वाटले त्या वेळी.
त्यानंतर तीन महिन्यापूर्वी ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम केला होता तेव्हा वस्तीतील गरजू मुलांच्या संख्येची माहिती रीतसर गोळा केली होती, तिच यावेळी उपयोगी पाडली आणि आम्ही पुस्तकांसोबत वस्तीतील प्रवास सुरू केला. वस्तीमधील बच्चा पार्टी आता चांगलीच ओळखीची झाली आहे, आम्हांला बघून त्यांनी तर आनंदाने उड्याच मारायला सुरुवात केली. मग पुस्तकरूपी आनंद आम्ही त्या चिमुकल्यांसोबत देखील वाटला आणि एकंदरीत सगळ्यांचा हा खास दिवस खूप सारा आनंदी होऊन गेला.

आनंदाचे हे रंग,
आनंदाचे तरंग.
आनंदी करण्या सर्वांना,
चला होऊ एकसंघ.

शेवटी इतकंच सांगेन तसं बघायला गेलं तर फार लहान उपक्रम होता हा, पण म्हणतात ना लहान लहान गोष्टी करत राहिलं कि नक्कीच काही मोठं ध्येय साध्य करता येतं…अगदी तसंच या घोट्याश्या उपक्रमातून खूप मोठा आनंद अनुभवाला सगळ्यांनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top