My Stories

मा. खे. मो. खे.

आजही आठवतय मला…शनिवारी शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी असायची आणि शाळेत माझं सगळं लक्ष शाळा सुटण्यासाठी वाजवल्या जाणाऱ्या त्या घंटेकडे असायचे. वाटायचे केव्हा घंटा वाजते, अन मग मी धावत पळत घरी पोहोचतोय..घरी पोहोचल्या पोहोचल्या पलंगाच्या बाजूला ठरलेल्या कोपऱ्यात दप्तर भिरकवायचं आणि जमलं तर कपडे बदलायचे, नाही तर आहे त्याच कपड्यात चाळीच्या टोकावर असणाऱ्या मैदानात धूम ठोकायची. तिथे आम्ही सगळे सैराट मित्र एकत्र जमायचो आणि मग आठवड्यानुसार ठरलेला भोवरा..गोट्या..नाहीतर क्रिकेटचा डाव रंगायचा. एक वेगळीच मज्जा होती या मैदानातल्या खेळांची. तुम्हांला सांगतो, तसा माझ्या शाळेच्या गणवेशातील शर्टाचा रंग पिवळा पण खेळून घरी जाताना तो जवळपास तपकेरी होऊन जायचा. त्या बदललेल्या रंगाकडे बघून बऱ्याचदा आईच्या तोंडावरचे हावभाव पण बदलायचे, हसत मला पाहणाऱ्या तिच्या डोळ्यांवर अचानक आट्या यायच्या, कारण शाळेचा गणवेश मी खूप खराब केलेला असायचा. मग आईला लाडीगोडी लाऊन तिच्या गळ्यात पडून सांगायचं, ‘ही शेवटची वेळ..परत नाही करणार.’ आणि भोळी भाबडी माय, मी तोंड छोटं केलं कि लगेच जवळ घेऊन बिलगायची. आणि मग माझ्या अंगावरचे कपडे काढत मला बाथरूममध्ये घेऊन जायची आणि मस्त खसखस चोळून अंघोळ घालायची. अंगोळ घालताना उगीचच मी तिच्या अंगावर पाणी उडवायचो, भिजायला झालं म्हणून तीन रागवायचं, मग परत मी तोंड छोटं करून रुसन्याच नाटक करायचं आणि तिने मिनिटाच्या आतच मला मनवायचं…हे चक्र ठरलेलं..

मैदानात खेळताना आम्ही खूप सार चिडायचो (आम्ही म्हणण्यापेक्षा ‘मी’ म्हणणं सोयीचं ठरेल.) विशेष म्हणजे गोट्याचा डाव रंगलेला असताना, ” साईड सबकुछ ” म्हणत उगीचच वीथीतल अंतर कमीजास्त करायचं. भोवरा फिरला नसेल तरीही तो फिरला आहे असं ओरडत आपलच खरं करायचं. क्रिकेट मध्ये तर आपली बॅटिंग असेल तर स्लिपररुपी स्टंप मधलं अंतर इतरांचा डोळा चुकवून कमी करायचं, तेच दुसऱ्याच्या बॅटिंग वेळी ते डबल करायचं. मग या चीडन्यातून कधी कधी मित्रांसोबत भांडण देखील व्हायची, पण त्या भांडणात देखील एक वेगळीच मज्जा होती राव.

त्या मैदानाला लागूनच एक मोठं पिंपळाच झाड होतं, त्याच्या भोवती लहानमोठी खूप झुडपे होती. दर रविवारी तिथे आम्ही लपंडाव खेळायचो, कधी त्या झुडपात तर कधी आजूबाजूच्या चाळीत लपायचो. लपंडाव खेळताना घडलेला एक गमतीदार किस्सा सांगतो, एकदा मी पाण्याने अर्धा भरलेल्या पिंपातच जाऊन लपलो आणि झाकण उघडल्यावर थप्पा म्हणतं ताडकन उठलो आणि लफडा म्हणजे ते झाकण त्या पिंपाच्या मालकीनीने उघडलेलं. मग काय त्या काकूंनी माझा कान पिळत मला तसाच ओला चिंब माझ्या घरी आणलं. आणि त्यात माझ्या आईचा कहर म्हणजे तिने मला ओरडायचं सोडून त्या काकूंनी माझा कान का पिळला या गोष्टीवर त्यांच्यासोबतच उलट भांडन छेडलेलं.

तस तर या मैदानी खेळाचे एक दोन नाही तर असंख्य किस्से मनात घर करून आहेत. माझ्या आयुष्यात एक वेगळीच जागा आहे यांची. पतंग उडवायची आणि गुल झालेली पतंग पकडायची हौसच काय न्यारी. पुढे जाऊन मग मांजाची केलेली लूट म्हणजे सोनेपे सुहागा. हे खेळ खेळताना खूपसारी ऊर्जा निर्मिती व्हायची, चांगला व्यायाम पण व्हायचा, आणि भूक पण मग खूप लागायची. छोट्या मोठया होणाऱ्या या भांडणातून थोडीबहोत दुनियादारीचे धडे पण भेटायचे. पण आजकाल या प्रॅक्टिकल धड्याची जागा मोबाईलच्या शिकवन्यानी घेतले.

आता मूळ विषयाकडे वळतो, तुम्ही विचार करत असाल मा.खे.मो.खे काय भानगड आहे आणि तिचा वरील आशयाशी काय संबंध आहे? लवकरच कळेल पण त्या आधी हा व्हिडिओ बघून घ्या.

२६ जानेवारीला जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला तेव्हा लहानपणीच्या बऱ्याचश्या आठवणी ताज्या झाल्या आणि मग मी ठरवलं या विषयावर लिखाण करायचं पण नंतर ते राहून गेलं पण गेल्या वीकएंड ला जवळच्या नातेवाईकाचे लग्न अटेंड करायला गावी गेलो होतो. लग्न दारात असल्याने सगळ्या विधी मंडपात. तहान लागली म्हणून मी दुपारी घरात आलो. घरचे सगळे बाहेर होते आणि दरवाजा फक्त्त पुढे ओढून घेतला होता, तो पुढे ढकलून मी आत गेलो तर आतल्या खोलीतून आवाज आला- ‘मार मार…पुढे जा..थांब.” हा आवाज कसला ते पहायला अजून पुढे गेलो तर माझा भाचा अर्णव पबजी गेमच्या एल. ओ. सी. वर जीवाचं पाणी करून लढत होता, तो त्या गेम मध्ये इतका मग्न होता कि मी त्याच्या जवळ गेलेलं हे त्याला कळालं सुद्धा नाही. (कव्हर फोटो तेव्हाच टिपला.) घरातले सगळे लग्नकार्याचा आनंद घेतायत आणि हे महाशय मोबाईल मध्ये डोळ्याच्या बाहुल्या ताणून बसले होते. आधी तर त्याला मी तो संपूर्ण गेम खेळून दिला, आणि नंतर google वर एक लिंक ओपन करून दिली. PUBG मुळे वेड लागणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ – अशी ती लिंक होती. मी न काही बोलता ते वाचून तो सगळं काही समजला होता. मोबाईल लॉक करून माझा हात त्याच्या हातात घेत तो म्हणाला Sorry मामा…चल आपण बाहेर जाऊ.

आधी कॅण्डी क्रश, नंतर ब्लू व्हेल, मग पोकीमॉन आणि आता PUBG यांसारखे गेम्स हे मुलांची सवय आणि डिप्रेशनचे कारण बनत चाललेत. आणि या गोष्टीसाठी या मुलांपेक्षा जास्त त्यांचे पालक जबाबदार आहेत. आपला मुलगा किंवा मुलगी आपल्या इजाजती शिवाय मोबाईलच्या इतक्या आहारी जाईल का? आपण त्यांना योग्य तो वेळ दिला तर तो विरंगुळ्यासाठी इतर साधनांवर अवलंबून राहील का? आपण खेळलेले मैदानी खेळ, त्यांनी खेळावे यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करतोय का? मग विचार करून तुम्हीच सांगा खरं प्रॉब्लेमच कारण कोण? मोबाईल कि गैरजबाबदार पालक !
मी ही तीन वर्षाच्या एका मुलाचा बाप आहे, माझा मुलगा रित्विक याला सुद्धा काही महिन्यांपूर्वी मोबाईलची सवय होत चाललेली, पण वेळीच आम्ही त्याला आमचा वेळ दिला आणि त्याच्या मोबाईल हाताळण्यावर नियंत्रण केले. हाच वेळ तुमच्याकडूनही तुमच्या पाल्यासाठी अपेक्षित आहे.

तर एकंदरीत मला तुम्हाला काय मॅसेज द्यायचाय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण यावेळी मी एक आगळावेगळा आणि दरवेळेप्रमाणे काहीतरी नवीन प्रकार करू पाहतोय, मी ईथे मातीतले खेळ विरुद्ध मोबाईलचे खेळ अशी शाब्दीक जुगलबंदी करू पाहतोय.

*मा.खे Vs. मो.खे*
(मातीतले खेळ) (मोबाईल खेळ)

१. मा खे. मुळे शरीराचा व्यायाम होतो
मो.खे. मुळे डोक्यावर ताण येतो, डोळ्यांचे
आजार होतात.

२. मा. खे. आपल्याला मातीशी जोडतात.
मो.खे. आपल्याला माणसांपासून दुरावतायत.

३. मा.खे. मुळे मुलांची भूक वाढते.
मो.खे. मुळे मुलांची चिडचिड वाढते.

४. मा.खे मुळे मुलांमधला संवाद वाढतो.
मो.खे. मुळे मुलांतला एक्कल कोंडेपणा
वाढतो.

५. मा.खे. मध्ये बऱ्याच सायंटिफिक गोष्टींची जोड
आहे.
मो.खे. मध्ये पाश्चात्य संस्कृतीची विकृती आहे.

६. मा.खे. कधीही चांगलेच
मो.खे. कधीही हानिकारकच

Now Decision is all yours…

17 thoughts on “मा. खे. मो. खे.

 1. Khup chaan ani agdi imp message tumhi sarvasanthi dila ahe amchyahi mulichya babtit asach ghadyla laglela but amhihi mobile na deta amhi swataha sagle tichyashi jasta savand sadhyla laglo now she dont want mobile …khupach sunder ani agadi mahatvacha vishay hatala ahe .thanks vijay mane sirji…..

 2. एकदम बरोबर हया गेम मुळे वेड लागले लोकांना खास करून लहान मुलांना..हया मोबाईल गेम मुळे मातीतले खेळ विसरत चाललेत मुल. तु खूप छान लिहिले एकदम बालपणीचे खेळ आठवले

 3. Tu agadhi barobar aahes. Halli mula mobile, video games madhe yevadhi ramtat ki hey matitle khel tyanna mahitich nahiyet. Tyat asa kahi karna mhanje ek revolutionach aahe bhava. Me tuzya sobat aahe.

 4. बरोबर आहे सर ..मानसिक तणाव पण वाढतो मो.खे ने आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फॅमिली मधला संवाद तुटत चालला आहे ..कारण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोबाईल शी जोडले गेले आहेत..त्यामुळे पुन्हा मुलांचे मन कसे मा. खे कडे वळवता येईल या कडे लक्ष्य दिले पाहिजे..बाकी तुमच्या पोस्ट ,उपक्रम खुपच छान असतात

 5. Ekdam barobar Vijay
  Mala watata hya made parents Chi chuki ahe Tech mulanchya hathat mobile detat mhanje radat asel mobile denar, jevat nasel tar mobile dear ani mag tyana savay lagate.
  Mazya eka friend ne tar tichya 5 varshachya mulala tablet aanun dila hota ka tar tyanchya society made tyachya vayachi mula nahit mhanun.. Parinam Kay zala evdhya lahan vayat tyala sugar cha problem zala karan je to khyacha sarva body made sathat rahila..
  Mazi request ahe sarva parentsna please khelayla koni nasel tar tumhi swata mulansobat khela…

 6. विजय भावा,
  मा खे मो खे : पहिल्यांदा वाटलं काय शिर्षक आहे. म्हणजे काय असेल माझा खेळ मोठा खेळ. तर्क वितर्क करत वाचत होतो, मग कळलं वाह क्काय !! शिर्षक आहे . . . .
  पुन्हा एकदा छान विषय घेऊन video बनवलास तू. हे खेळ खरचं चालू राहिले पाहिजेत. मुलांना mobile देण्यापेक्षा quality time द्यावा. निसर्गाशी ओळख करवावी.
  तू हा विषय घेतलास, खुप धन्यवाद!

  -YatishG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top