My Stories

हॅलो मी जिवंत आहे

ट्रेन मधून प्रवास करताना संध्याकाळी व्हाट्सअपवर अचानक अवखळी मेसेजेसच थैमान चालू झालं, वेलेन्टाईन्स डे मुळे असेच काही सर्वसाधारण मेसेज असतील असं वाटलं म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ऑफिसच्या दिशेने वाटचाल चालू ठेवली. विक्रोळी स्टेशन वर उतरलो आणि एका मित्राचा फोन आला पुढून आवाज आला, “ईज्या भावा कुठं हायस गावी का मुंबईला?” मी म्हणलं मुंबईला. मी काही पुढे विचारेन इतक्यात त्यानं फोन कट केला. हा प्रकार काय होता हे मला काहीच कळेना, मी त्याला कॉल बॅक करून पहिला, पण त्याचा नंबर व्यस्त लागत होता. त्यात मेसेजसच थैमान काही थांबलं नव्हतं त्या मेसेजेसच्या वादळामुळे मोबाईल नुसता व्हायब्रेट होत होता. मग मी व्हाट्सअप ओपन केलं आणि डोळ्यांसोमर आलेल्या पहिलाच फोटो पाहून जागीच स्थब्ध झालो, मन कासावीस झालं, डोक्याला झिणझिण्या आल्या, असं वाटलं कोणी तरी हजार तालवारिंचे वार एकाच वेळी काळजावर केलेत, पाय पायात लडखडू लागले. जवळच असलेल्या प्लॅटफॉर्म वरच्या बाकड्यावर स्थिरावलो. तो फोटो होता माझ्या वर्दीतल्या जवानाचा, त्याच्या फाटलेल्या शरीराचा. जसा कागद फाटावा तसं त्याच अक्ख शरीर फाटलेलं हो…फक्त्त हातच स्पष्ट कळत होता, बाकी अवयवांची काही ओळख पटत नव्हती. मग मी फुलवामा अटॅक चा मेसेज वाचला, एका मागोमाग एक असे सात मन विचलित करणारे फोटो नजरेसमोर आले आणि क्षणभरासाठी डोकं सुन्न झालं. कानात ट्रेन प्लँटफॉर्मची गर्दी किंवा इतर कसलाच आवाज येत नव्हता, कोणी जोरात कानाखाली चपराक मारल्यावर जसं कानठाळ बधिर होतं अगदी तशीच काही अवस्था झाली होती माझी. आणि अचानक कानावर माझ्याच फोनच्या रिंगटोनचा आवाज आला, परत त्याच मित्राचा फोन आला.

पुढून आवाज आला, ईज्या आरं गावी कोण हाय का पोरांपैकी?
मी विचारलं, अरे पण काय झालं?
तो म्हणाला आरं पुण्यात माझ्या रूम मध्ये सोबत राहत होता त्यो आतल्या म्हायत हाय नव्ह तूला ! मी म्हणालो हो…तो आपल्या गावकडचाच हाय ना.!
तो म्हणाला “हो”, नेटवर्क मुळे त्याचा आवाज तुटक येत होता..पुढे तो म्हणाला..आरं त्याचा थोरला भाव मिल्ट्रीत हाय काश्मीरला. इतकचं ऐकूनच काळीज तर्रर्र झालं, थरथरलेल्या ओठातून आता शब्दच फुटेना , मनात एकाच वेळी असंख्य प्रश्नाचं काहूर माजलं..काय बर झालं असेल? याला मला काय सांगायचं असेल? तो जवान भाऊ सुरक्षित तर असेल ना? वगैरे वगैरे…तितक्यात नेटवर्क पूर्णच गेलं. मोठी हिम्मत करून मी प्रतिप्रश्न केला, बोल आरं काय झालं लेका…माझा आवाज यतोय का? आरं असं जीव टांगणीला लाऊ नकोस…काय तरी बोल रं…डोळे एकदम डबडबले..डोकं गरगरू लागलं. आणि इतक्यात त्याचा आवाज परत ऐकू आला. ‘आरं त्यो दादा सेफ हाय’. हे ऐकून जो आनंद झाला ते काय विचारू नका, रडकुंडीला आलेल्या माझ्या चेहऱ्यावर एकदम हसू उमटलं. तो म्हणाला आरं त्यांची पोस्टींग काश्मीरलाच हाय पण दुसरीकडं हाय, त्य दादा सुरक्षित हाय हे त्याच्या घरला त्याच्या बायकुला सांगायचंय पण कुणी फोन उचलणा झालय रं. फेसबुक वर तुझं गावाकडचं फोटो बघितलेलं, म्हणून वाटलं तू गावी आसशील.

मी त्याला म्हणलं, मी आलोय मुंबईला पण अजून पोरं आहेत गावी. तू दादांचा नंबर दे मला, मी करतो कॉन्टॅक्ट. त्याने दादांचा नंबर व्हाट्सअप केला. मी लगेच गावी फोन फिरवला आणि खास मित्राला बाईक काढायला सांगितली, मग त्या दादांचं गावं गाठायला सांगितलं, जे कि आमच्या गावापासून सात ते आठ किलोमीटर वर आहे. यासगळ्या गोष्टीत बराच वेळ गेला होता आणि दिवस मावळून आता अंधार पडला होता. अंधारातून रस्ता चाचपडतं माझा मित्र कसाबसा त्या गावात पोहोचला, गावात विचारपूस करत त्याने दादांचं घर गाठलं, हल्ल्याच्या बातमीमुळे संपूर्ण गावात वातावरण गंभीर झालं होतं. माझ्या मित्राने दार खटखटवलं पण आतून कोणी उघडलं नाही. बराच प्रयत्न करून त्याने मला परत फोन लावला आणि घरातून रडण्याचा आवाज येतोय पण दरवाजा कोणी उघडतं नसल्याचे सांगितले, चाललेल्या या प्रकारामुळे गावातील माणसंसुद्धा घराभोवती जमा झाली होती. मी त्याला म्हणालो एक काम कर, दादांना फोन कर आणि स्पीकर ऑन करून दरवाज्याजवळ त्यांचा आवाज ऐकव.

आतून येणाऱ्या हुंद्क्या आणि गावकऱ्यांच्या श्वासांशिवाय आता दुसरा कसलाच आवाज येत नव्हता, त्याने स्पीकर ऑन करून नंबर फिरवला आणि रिंगचा आवाज ऐकू येऊ लागला तसा आतून हुंदक्यांचा आवाज कमी झाला. समोर दादांनी फोन उचलला, माझा मित्र म्हणाला, दादा बोला वैनी ऎकतायत. दादा म्हणाले ” हॅलो…मी जिवंत आहे.” इतकं ऐकून दरवाजा ताडकन खुलतो. थोडासा चिडलेल्या आवाजात दादा विचारतात – फोन का उचलत नव्हतीस??
.
.
वाहिनी रडायला लागतात… जोरात! हंबरडा फोडतात… कानात रडायचा जोरात तो आवाज अन किंकाळ्या घुमायला लागतात..

ते ऐकून, त्यांचा झालेला अवतार – मला डोळ्यासमोर स्पष्ट, स्पष्ट दिसायला लागतो…तोंडा नाकातून गळत असलेली त्यांची लाळ – कोसो किलोमीटर दूर असलेल्या दादांच्या हातावर पडायला लागते…ओघळायला लागते..!

शेवटी रडत-रडत त्या एवढंच म्हणतात…
.
.
.
.
.
.
फोन उचलायला भीती वाटतेय हो आता…जीव फाटत चाल लाय हळूहळू माझा…

मित्र मैत्रिणींनो…

तुम्ही सहज दिवसभराच्या बातम्या पहात असाल, ट्रेन/बस मध्ये प्रवास करत असाल, किंवा आजचा दिवस हसत साजरा करत असाल, आई वडिलांशी निवांत गप्पा मारत असाल, आपल्या पोरांसोबत खेळत असाल, किंवा उद्या परवा पिच्चरला जायचा प्लॅन करत असाल… चांगलंच आहे ते..हे केलेच पाहिले…याला माझी काहीच हरकत नाही…

फक्त एवढंच सांगायचं होतं की
.
.
.
त्या काशमीरात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या घरची परिस्थिती आज या घडीला ही अशीच काही आहे……अशे दोन हजार पाचशे सत्तेचाळीस सैनिकांच्या घरचे फोन सध्या जोरर,जोरात खणखणतायत…

पण ते उचलायची हिम्मत …………..

18 thoughts on “हॅलो मी जिवंत आहे

 1. लेख वाचून अंगावर काटा उभा राहिला
  आपल्या घरातली एखादी व्यक्ती एकदिवस ऑफिस मधून घरी यायला लेट झाली तर आपण 10 कॉल करतो आणि विचारपूस करतो की “बाबा रे सुखरूप आहेस ना…?”
  पण आपल्या जवानांच्या कुटुंबियांचा काय ? त्यांचं लेकरू तर दिवसरात्र सीमेवर शत्रूच्या समोर उभं असतं
  कुटुंबाच्या नजरे पलीकडे कित्येक महिने फक्त देशासाठी जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी लढत असतं…
  त्याच्या कुटुंबाच्या मनाची काय अवस्था होत असेल याची कल्पना ही करणे खूप कठीण आहे…

 2. भावपूर्ण श्रद्धांजली
  खूपच भयानक घटना ,भारत देशातील लोकांसाठी १४ फेब्रुवारी चा दिवस काळा दिवस होता.
  खूपच भयानक अशी गोष्ट आहे, खरंच आपण ह्या, जवानामुळे जिवंत आहोत,,,,,
  डोळ्यात पाणी आणि मनात प्रचंड संताप आहे.
  किती वेळा आणि किती दिवस चालणार हे.?
  आणि दुर्दैव असे की नेहमी प्रमाणे यावर राजकारण होणार..!
  भावपूर्ण श्रद्धांजली या शब्दांच्या पलीकडची अवस्था आहे.
  ✍✍✍

 3. मी आपल्या मताशी सहमत आहे, पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना सलाम, त्यांच्या परिवारवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सारा भारत देश त्यांच्या पाठीशी आहे. जय हिंद. जय जवान. सुभाष शांताराम जैन पत्रकार,

 4. सकाळी पोस्ट पाहिल्या नंतर वाचयला घेतली. तितक्यात तुमच्या नवीन मैत्रिणीचा फोन आला नाश्ता करायाला येते आहे. मग तुमचा मित्र कांय सांगू इच्छित होता , यातच गुंगून गेले. कशीबशी कामे आवरली नि आणि काल पासून अवसान गळाल्यासारखे झाले आहे त्यामुळे काही गोळ्या घेतल्या आणि वाचयला बसले

  खरच , पोस्ट वाचताना तुमचे ते गाणे आठवत होते ” मामाच.पत्र हरवलं , त्येच आम्हांला सापडल ” जणु तुमचा मित्र तेच खुशालीचे पत्र घेऊन निघाला होता जणु. आजकाल मोबाईल आहेत हो पण तेंव्हाचे कांय ? जेंव्हा मोबाईल नव्हते , पुरेशी व्यवस्था नव्हती, त्यावेळी कांय हालत होत असेल. शहीद जवानांची पार्थिव घरा पर्यंत पोहोचे पर्यंत काहीही खबर मिळत नसेल.
  बाकी , त्या माऊलीच्या मनाची घालमेल आपल्या समजण्या पलीकडे आहे. काल श्रध्दांजली वाहण्यासाठी 5 मिनिटे तिथे थांबले तर कांय अवस्था झालेली, हे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे.
  मी वाटते खुप strong आणि विचारांनी आहे देखील पण मनाने खुप कमजोर आहे.
  खरच , सैनिक पत्नी होणे किंवा आपल कोणीतरी सैनिकांत असणे यांच्या भावना समजणे खूप कठीण आहे.
  म्हणतात ना , “जावे ज्याच्या वंशा, तेंव्हा कळे ”
  आपण फक्त इथे बसून पोस्ट करू शकतो , अश्रू ढालु शकतो , फुकटचे सल्ले देऊ शकतो पण खरी लढाई सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय लढत असतात.
  खरच , आज Savita Jadhav Godage जी सारख्या अनेक महिला आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीर उभ्या आहेत , जिजाऊ प्रमाणे आपल्या मुलांचे संगोपन करत आहेत , यासाठी त्यांना खरच सलाम
  जय हिंद

 5. I proud of you jiju…kharach deshamadhlya prattek nagrikacya manamadhe hi bhavna ani ha sanman asayla pahije…pan as farsa disun yet nahiye…jiju,mi tumchya manamadhlya bhavna itar deshvasiyanchya manamadhe shodhnyacha ek chotasa prayatn kela…pan tya,panyamadhe moti sapadnya pekshahi viral hotya…14 feb. La hi ghatna ghadli ani tyach divshi ranveer singh(je aaplya deshvasiyanchya najret HERO ahet) cha “GULLY BOY” ha movie release jhala…mi aplya deshvasiyanchya bhavna padtalun pahnyasathi ya movie che divsbhratil sarv show online check kele…ani majh man agdi tumchya pramanech sunna jhal…karn tya movie che divasbharache sarv show pre-booked hote…ani tehi housefull…
  Ya saglyacha ekch arth hoto ki aplyala ya saglya goshtincha kiti farak padto ani he dekhil siddha hot ki aapan aaplya bhartiya sainyabaddal kiti krutadnya ahot…vichar karnyasarkhi gosht ahe mitraho…aplya manatle he sankuchit vichar fakt eka divsasathi jari aaplya sarv sainnyachya manat ale tar aaplya deshala gagachya nakashatun gayab vayla kiti vel lagel?…
  aapn aaplya eka parivarala sukhrup thevnyasathi aayushyabhar kasrat karat rahto…tar mag aplya purn deshala surakshit thevnyasathi tyanna kiti tyag ani vedna sahan karavya lagat astil,yach mojmap karna majhya tari kuvatichya baher ahe…baki tumhi sudnya ahatach…✍

 6. I proud of you jiju…kharach deshamadhlya prattek nagrikacya manamadhe hi bhavna ani ha sanman asayla pahije…pan as farsa disun yet nahiye…jiju,mi tumchya manamadhlya bhavna itar deshvasiyanchya manamadhe shodhnyacha ek chotasa  prayatn kela…pan tya,panyamadhe moti sapadnya pekshahi viral hotya…14 feb. La hi ghatna ghadli ani tyach divshi ranveer singh(je aaplya deshvasiyanchya najret HERO ahet) cha “GULLY BOY” ha movie release jhala…mi aplya deshvasiyanchya bhavna padtalun pahnyasathi ya movie che divsbhratil sarv show online check kele…ani majh man agdi tumchya pramanech sunna  jhal…karn tya movie che divasbharache sarv show pre-booked hote…ani tehi housefull…
  Ya saglyacha ekch arth hoto ki aplyala ya saglya goshtincha kiti farak padto ani he dekhil siddha hot ki  aapan aaplya bhartiya sainyabaddal kiti krutadnya ahot…vichar karnyasarkhi gosht ahe mitraho…aplya manatle he sankuchit vichar fakt eka divsasathi jari aaplya sarv sainnyachya manat ale tar aaplya deshala gagachya nakashatun gayab vayla kiti vel lagel?…
  aapn aaplya eka parivarala sukhrup thevnyasathi  aayushyabhar kasrat karat rahto…tar mag aplya purn deshala surakshit thevnyasathi tyanna kiti tyag ani vedna sahan karavya lagat astil,yach mojmap karna majhya tari kuvatichya baher ahe…baki tumhi sudnya ahatach…✍

 7. खरंच आत्ता आतंकवाद्या बद्दल असे काहीतरी ठोस केले पाहीजे की परत कोणाचीही भारतावर हल्ला करण्याचा विचार करण्याची हिम्मत झाली नाही पाहीजे……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top