My Stories

फौजी

URI:The Sergical Strike – बऱ्याच दिवसांनी देशभक्ती ने उर फाटून येईल इतका भन्नाट चित्रपट कुटुंबासोबत चित्रपटगृहात पहिला. ट्रेलर पाहिला तेव्हाच मनात आलं होतं. या चित्रपटात नक्कीच काही तरी आऊट ऑफ द बॉक्स बघायला मिळेल. पण उरी हमला, २९ सप्टेंबर २०१६ च संपूर्ण सत्य आणि त्या मागच्या अभ्यासाची तपशील माहिती इतक्या जिवंत स्वरूपात बघायला मिळेल याची मला अजिबातच कल्पना नव्हती.
एखादी गोष्ट आवडली की मनापासून त्याच कौतुक करायची माझी सवय जुनीच. मग काय लगेच फेसबुक वर पोस्ट टाकली आणि त्यात माझ्या सगळ्या मित्रांनी आपल्या कुटूंबासह हा पिच्चर बघावा असं आवर्जून नमूद केले.

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस गाठले…मित्रांसोबत चहा पिण्यासाठी कॅन्टीन मध्ये गेलो आणि नेमका टेबल वर सुद्धा सर्जिकल स्ट्राईक बद्दल चर्चा चालू होती. मी माझे पिच्चर बद्दलच सकारात्मक मत इथेही मांडले. तितक्यात एक शहाणा बोलला, त्यात Winner Winner Chicken Dineer फंडा दाखवलाय ना ! आईच्या गावात…अशी डोक्याची तार हलली ना माझ्या, कि काही विचारू नका. अरे इंडियन आर्मी ने रचलेल्या त्या तुफान पराक्रमाची तुलना एखादया थुकरट गेम सोबत करावी ! (कोणत्या गेम बद्दल बोलतोय हे तुम्हांला कळालं असेलच.) या एका वाक्यातून मला त्याचीच नव्हे तर असा विचार घेऊन पाश्च्यात्य गेम्स ना आपली संस्कृती करू पाहणाऱ्या आजच्या तरुण मुलांच्या विकृत मानसिकतेची अगदीच किव आली. आता हेच जर विचार असतील तर पुढे जाऊन त्यांचे ध्येय ते काय असणार!…म्हणून मुद्दाम मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. बोलता बोलता कळालच नाही, पिच्चर बद्दलची चर्चा फौजी विषयावर केव्हा जाऊन पोहोचली.

तसं तर सगळ काही मस्त चाललं होतं. टेबलावर प्रत्येक जण फौजी, देशभक्ती, शौर्य आणि जवानांचा पराक्रमा बद्दल आपल्या प्रतिक्रिया वेग वेगळ्या विषयातून मांडत होते.. त्यात एकाने मेजर संदीप उन्नीक्रिष्णन यांचा विषय मांडला. ते सगळं ऐकून अंगावर शहारा आला होता, तितक्यात पुन्हा तोच दीड शहाणा परत मध्येच पचकला..”काही नाही रे… इतकं काही अवघड नसत फौजी लोकांचं आयुष्य..एक तर इतकी कमी त्यांची सर्व्हिस.. त्यात मोजक्याच लोकांना बॉर्डरवर पोस्टिंग मिळत असावी, बाकीच्यांना रिटायर्ड होई पर्यंत एखादया चकमकीला सुद्धा समोर जाव लागत नसावं.” आत्ता मात्र याने चुकीच्या विषयात हात घातला. आणि माझ्या समोर कोणी उगीच निव्वळ लक्ष वेधून घेण्यासाठी असं काही वायफळ बोलताना सापडलं की त्याला मी चांगलीच शाब्दीक चपराक हानतो… आणि त्याचे हे वाक्य तर चपराकीच्या पलीकडचं होते.

त्या नंतर पुढची पंधरा ते वीस मिनटं जो तिथल्या सर्वांच्या विचारांचा बांध तुटला, त्या समोर त्याला सर्वांची माफी मागावी लागली. आणि शेवटी त्याने मान्य सुद्धा केलं की कुटुंबा पासून दूर राहून, समोर येईल त्या परिस्थितीवर मात करत फौजी जे खडतर आयुष्य जगतात ते सर्वसामान्य माणसाच्या विचारा पलीकडचे आहे.

लोकशाही शासन असलेला आपला भारत देश आणि आपण या देशाचे सुजाण…जबाबदार नागरिक. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतंत्र बोलण्याचा अधिकार आहे…पण जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलत असतो, तेव्हा ती गोष्ट आपली जबाबदारी असते हे भान बोलणाऱ्याने ठेवले पाहिजे. पब्जि…किंवा या सारख्या इतर गेम्स ना संस्कृती समजून त्यांच्या आहारी जाणाऱ्या युवा पिढीला इतकचं सांगेन, एकामागून एक गेम तरुणांच्या सवयी होत चाललेत जे मला सध्या शत्रू राष्ट्रांकडून होणाऱ्या घातक हल्ल्या पेक्षा जास्त भयानक वाटू लागले आहेत, कारण हल्ले फक्त मनुष्यहानी करतात हो, पण हे गेम्स तर तरुणांच्या ध्येयवादाचे खच्चीकरण करू पाहतायत, त्यांच्या मानसिकतेला विकृत विचारांच्या सिमीत चौकटीत अडकवू पाहतायत…आणि या सगळ्या प्रकारात जर त्यांचे राष्ट्रप्रेम इतके बोथट होत चालले असेल तर या पेक्षा वाईट गोष्ट अजून काय बरं असू शकते….????
आणि खरेच जर असे झाले तर शत्रू राष्ट्रासाठी कोणतीही लढाई न करता मिळवलेला जगातील तो सर्वात मोठा विजय असेल हे मात्र नक्की…

विचार विचलन न करता मूळ विषयाकडे पुन्हा येतो. मुळात माझे मामाच फौजी, त्यामुळे भारतीय जवानांच जगणं मी अगदी लहानपणापासून जवळून पाहिलय. मामा सुट्टीवर आले की त्यांचे सगळे अनुभव आम्हांला सांगायचे, मग त्यांच्या प्रत्येक शब्दातून सीमेवरचा थरार, तसेच जवान आणि भारतमाता या दोघांच्या अतूट प्रेमळ नात्याची कल्पना यायची. ” कुटुंबापासून जरी दूर असलो, तरी आपल्या भारतमातेच्या कुशीत महेफूस असतो…तिच्या रक्षणासाठी स्वतः ला झोकून दिले कि ऊन, वारा, पाऊस कसलीच फिकीर वाटत नाही…” हे मामांचं आवडत वाक्य..सीमेवर तटस्थ ऊभे राहून येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन ते भारतमातेच्या आणि भारतवासीयांच्या म्हणजेच तुमच्या आमच्या संरक्षनासाठी ज्या पद्धतीने झटतायत ना… त्यांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही हो…. दुसरं कोणीच नाही…अरे इथे फक्त्त मॉर्निंग शिफ्टची नाईट शिफ्ट झाली कि रडणारे तुम्ही, कसं बरं अगदी शून्य अंशाहून कमी तापमान असणाऱ्या पर्वतरांगात फौलादी अभेदय दिवाळ बनून ऊभे असणाऱ्या जवानांच्या जगण्याचा अंदाज लावणार…!

Let us take this opportunity to Thank Indian Army and Security Forces, because of whom we all are secure and enjoying a Happy Wali Feeling in our Mother Land.

*जय हिंद*

13 thoughts on “फौजी

  1. तरुणांच्या विचाराना महाराजांची झळाळी आणि हाताना सैनिकाच बळ येन ही या काळाची खरी गरज आहे पण ही तरुणाई फेसबुक च्या लाईक मधेच हरवून बसले हे सगळ्यात मोठ दुर्दैव आहे. आपले खरे हिरो सीमेवर तैनात राहून जागत आहेत म्हणुन आपण आपल्या कुटुंबा सोबत सुखाने जगतोय हे लक्षात राहीलच पाहिजे आणि जर कोणाला विसर पडला त्याला अशी जाणीव करून देन हे ही देश रश्रण करणेच आहे. जय हिंद।

  2. कुटुंबा सोबत नुकताच उरी पाहिला, पुन्हा पहावासा वाटतोय,कारण बॉर्डर वरच आमच्या फौजी च खडतर जीवन हिमालयातल्या गिर्यारोहनाच्या निमित्ताने गेली 24 वर्षे अगदी जवळून पाहतोय,नेहरू इन्स्टिट्युट ऑफ मौंटेनियरिंग, उत्तरकाशी,येथे ट्रैनिंग दरम्यान पण त्यांना जवळून अनुभवलंय,
    एवढं नक्की ते बॉर्डर वर जागते आहेत म्हणून आम्ही शांत पणे घरी झोपतोय,
    त्यांना त्रिवार सलाम….

  3. Goood bro…….barobar kelas……kharch Indian army great ahe……..त्यांच्या इतकी हिम्मत कोणातच नसते……….salute ahe…….अभिमान वाटतो इंडियन army cha ………jai hind…..Bharat Mata ki jai

  4. Very well written like always….. Salute to all our soldiers who are working hard just to keep us safe on the cost of thier lives.. They are real HEROES than filmstars and cricketers whom we gave lot of fame which they don’t deserve that extent……
    Jai Jawan…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top