My Stories

वर्षाची सुरुवात Happywalifeeling ने

आज एक जानेवारी तसा तर खूपच खास दिवस. याला दोन कारण, पहिलं म्हणजे आज पासून एका नवीन वर्षाची सुरुवात (तसं तर हिंदू संस्कृती नुसार नूतन वर्षाची खरी सुरुवात गुढीपाडव्यालाच,पण आज कॅलेंडर वर्ष बदललंअसं म्हणायला हरकत नाही.) आणि दुसरं कारण म्हणजे आजच्याच खास दिवशी लक्ष्मी चा वाढदिवस. लक्ष्मी ही माझी कोपरखैरणे बस्तीत राहणारी लहान बहीण, ती मला दादा म्हणते आणि मी तिला ताई म्हणतो. दोघे एकमेकांची मनापासून निःस्वार्थ काळजी घेतो, इतकं सोप्प आणि सरळ नातं आमचं. वर्षाची सुरुवात गोड करूया असा विचार करून थोडी जिलेबी आणि सगळ्यांसाठी वडापाव घेऊन मी बस्तीत लक्ष्मीचा वाढदिवस साजरा करायला आलो. मला बघून सगळेच खूश झाले, माझी भाबडी बहीण तर धावत पळत माझ्या जवळ आली, आणि हरकून म्हणली – दादा मला माहित होतं तू यणारच, तिने माझा हात पकडून मला बच्चा पार्टीकडे न्हेलं. मग मी खाऊ ची झोळी मावशींकडे दिली आणि तो वाटायला सांगितला. त्यांनी वडापावची थैली काढून मला दिली आणि म्हणाल्या मी जिलेबी ताटात घेऊन येते तोवर तुम्ही हे वाटा. मग काय चिल्लीर पार्टीनं मला घेरलं की राव. मी सगळ्यांना वडापाव देत होतो, पण आरतीला (लक्ष्मीची लहान बहीण) देताना तिने तो दोन बोटात पकडला. तसा मुळात आरतीचा स्वभाव खूप खट्याळ, मला वाटलं इथं पण तिची मस्तीच चालू आहे, म्हणून मी मुद्दामच म्हणालो-अन्न हे पूर्णब्रम्ह…त्याबरोबर मस्ती नाही करायची. तसा तिने हात मागे लपवला आणि दबक्या पावलांनी मागे सरकली. मग मी ही बाकीच्या मुलांसोबत रूदावलो. पण काही वेळाने पुन्हा आरतीकडे लक्ष गेलं, तेव्हा पण ती खाऊ दोन बोटात पकडून खात होती…आता मात्र मला कळालं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. मी तिला जवळ बोलावलं तिच्या हातातला वडापाव घेतला आणि हात सरळ पुढे करायला सांगितले…अगदी त्याच क्षणाला तिच्या दोन बोटांवरचे अगदी शेंगदाण्याच्या आकाराचे फोड दिसले. मी काही विचारेन इतक्यात मावशी माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या काल जाळात (शेकोटीत) शेकताना भाजलंय दादा. थंडीचा जोर वाढलाय रातच्याला जाळात आंग गरम करायच अन चादरीत घुसायचं, त्यातच वायच भजलय काल. मनात आलं…असं उघड्यावर झोपताना किती काही सहन करावं लागतंय या निष्पाप जीवांना. मी म्हणालो मावशी आहो थोडं नाही जास्त भजलाय, डॉक्टरांना दाखवायला हवं. लगेच तिला मी उचललं, माझ्या स्कुटी वर बसवलं आणि हॉस्पिटलच्या रस्त्याने निघालो. पुढच्या दहा मिनिटातच आम्ही जवळच असणारं स्वस्तिक हॉस्पिटल गाठलं, तिथं डॉक्टरांनी तिला तपासलं मग ड्रेसिंग करताना डॉक्टरांनी तिला तिच नाव विचारलं तिने नं घाबरता रुबाबात सांगितलं ” आरती “. मग तिला इंजेकशन द्यायचं होतं त्यांनी तिला वय विचारलं, तिने न काही बोलता नजर माझ्याकडे वळवली,अर्थात वय कमी असल्याने या प्रश्नाचं उत्तर तिला देता नाही आलं. पण आता गंमत म्हणजे तिचं वय मला पण माहित नव्हतं. पण माझ्या अश्या निशब्द राहण्यामुळे डॉक्टरांच्या चेहर्यावरचे भाव काहीसे बदलले…ते काही बोलतील त्या आधीच मी म्हणालो. मी हिला ओळखतो पण वय मात्र माहित नाही…हिच्या आईच्या अनुमतीनेच मी आणलंय हिला, नाहीतर उगीच गैरसमज कराल…पळवून आणलंय की काय!. डॉक्टर हसतच म्हणाले..आहो तुम्हां दोघांचे कपडे बघून ते केव्हाच समजलेलं. पण मग तुमचं आणि यांचं नातं काय…मी ही एक स्मित हास्य देऊन अगदीच फिल्मी स्टाईल मध्ये म्हणालो ” माणुसकीच “. आणि घडला प्रकार, तसेच happywalifeeling ची माहिती थोडक्यात सांगितली. त्यांना पण हे सगळं मनापासून आवडलं, हे चालू असताना त्यांनी तिचा पूर्ण उपचार केला. मग त्यांनी माझा नंबर मागितला आणि त्यांच्या फोन वरून मला मिस कॉल दिऊन म्हणाले, माझं नाव राजीव तुझ्याकडे सेव कर आणि कधी काही मदत लागली तर नक्की फोन कर. शेवटी आम्ही एक selfie घेतला. तिथून निघताना त्यांनी माझ्या पाठीवर एक शब्बासकीची थाप मारली आणि म्हणले You are doing great job dear…Stay blessed. आणि औषधाची चिट्ठी लिहून नर्सच्या हातात दिली. त्यांच्या या थापेने आणि दोन वाक्यांमुळे एक वेगळाच हुरूप आला मला. मग आरतीला घेऊन मी बाहेर रिसेप्शन काउंटर वर आलो त्यांनी औषधाची एक बाटली आणि डॉक्टरांची प्रेस्किप्शन पावती मला दिली आणि औषध दिवसातून दोन वेळ एक चमचा घ्या असं सुचवलं. मी ते ताब्यात घेऊन पाकीट हातात घेतलं आणि किती पैसे झाले असं विचारलं, हसतच त्या म्हणाल्या डॉक्टरांनी पैसे घेऊ नका असं सांगितलय. त्या पावतीच्या मागे डॉक्टरांनी एक हसऱ्या चेहऱ्याचं चित्र काढून त्यांच्याच अक्षरात happy wali feeling असं लिहलं होतं. ते वाचून जो आनंद झाला ना तो शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. तिथून मग आम्ही परत बस्तीत आलो, सगळ्यांसोबत थोडी जिलेबी खाऊन मी पण तोंड गोड केलं आणि बच्चा पार्टीबरोबर मज्जा करून तिथून निरोप घेतला. असा हा वर्षाचा पहिला दिवस…आजच्या दिवशी लक्ष्मीचा वाढदिवस साजरा झाला…आरतीच्या जखमेवर मलम पट्टी पण झाली…या निमित्ताने डॉक्टरांशी पण जोडलो गेलो…आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांनाच खूप सारी happy wali feeling अनुभवता आली… तुम्हीच सांगा….याहून गोड काय ती सुरुवात असू शकते नवीन वर्षाची!.

“Giving a Healthy Smile on a face is always a Happy Wali Feeling”.

34 thoughts on “वर्षाची सुरुवात Happywalifeeling ने

 1. स्तुत्य उपक्रम आहे अभिनंदन साहेब नमस्कार सर्वांना

 2. दादा खुपच छान लिहिलंय.
  आयुष्यात काही क्षण मनाला सुखावून जातात.

 3. सलाम भाई तुला……

  खुपच कमी आहेत जे
  नव वर्षाची सुरूवात अशी करतात…

  तुझ्या सोबत काम करण्यात वेगळीच मज्जा असते…हे मला ठाऊक आहेच …
  पण या happy wali feelings ने खरच खुप जणांना happy केलय….
  आपण रामाचा पाडा येथे एकत्र काम केलय पण मी सहा महिने ( Fire brigade) ट्रेनिंग साठी होतो त्यामुळे happy wali feeling मधे काम करण्याची संधी अजुन मला मिळाली नाही…
  आमच्या परिसरात वज्रेश्वरी येथे माझा भाऊ राहूल सोबत तु व तुझे मित्र यांनी तेथील गरीबांना ब्लॅकेट नव्हे तर खरच *माणूसकीची ऊब* दिली हे मला समजलेच पण मी घरी असतो तर नक्कीच मी सुद्धा तुमच्या सोबत असतो…

  आणि नक्कीच मला लवकरच तुझ्या सोबत काम करायला मिळेल याची खात्री आहे…..

  Happy wali feeling..#.

 4. नवीन वर्षाची चांगली सुरुवात केलीस भावा…… तुझ्या या अश्या वागणुकीचे नेहमीच कौतुक वाटते आणि अभिमान ही वाटतो तुझा……
  पुढील वर्ष असच happywalifeeling ne नक्कीच भरलेले असेल

 5. This post just touched my heart and soul and gave me more encouragement to give happy moments in someone else’s life! Love your work

 6. विजय दादा खूप छान

  खरं तर जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून कोणासाठी करत असतो तेव्हा नक्कीच ते बघुन इतरांना देखील तस करायची प्रेरणा मिळत असते ..

  या वर एवढाच बोलेल कि माणुसकी अजून संपलेली नाही बस कुठे तरी ती जागवण्या साठी कोणीतरी हवा असतो आणि ते चांगलं काम तू करत आहेस

 7. विजूदादा खूप छान

  माणुसकी अजून जीवन आहे बस ती प्रत्येकाच्या मनात जागवणारा कोणी तरी हवा असतो आणि ते चांगलं काम तू करत आहेस

 8. विजय भावा,
  तुझ्या कला तरी किती आहेत. प्रत्येक वेळेला खरचं खूप छान वाचायला मिळतं. तुला अशीच प्रेमाची माणसे या वर्षी देखील मिळोत.
  नव वर्षाच्या happy walya शुभेच्छा

  YAGA

 9. खूपच सुंदर नवीन वर्षाची सूरवात happywalifeeling

 10. एकदम झकास स्टोरी , मला खुप आवडली..
  तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 11. दादा खरचं तू भारी आहेस.तू जिथे जातो तिथे
  माणस जोडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top