My Stories

Project Warm Wishes

यंदा रित्विकचा वाढदिवस एखाद्या बस्तीत लहान मुलांसोबत साजरा करायचा हे मनापासून, ठरवलेलं आणि ठरवल्या प्रमाणे तीन नोव्हेंबर ला सकाळी घणसोली नोड सिग्नल लगत राहणाऱ्या लोहार कुटूंबासोबत आंम्ही बाळाचा वाढदिवस साजरा केला. तिथल्या बच्चा पार्टी सोबत केक कापला मग थोडा खाऊ वाटला आणि खूप सारी मज्जा केली. त्यांनी मोठ्या मनाने आम्हांला आशीर्वाद दिला आणि आम्ही तो भर भरून घेतला. पण हा कार्यक्रम करताना नजरेत एक चित्र कैद झालं होतं ते काही केल्या डोळ्या समोरून जात नव्हतं.

याच दिवशी संध्याकाळी कौटुंबिक सेलिब्रेशन एका हॉल मध्ये पार पडलं त्यात घरातील सदस्य आणि इमारतीतील काही मित्रमंडळी सहभागी होती. कोपरखैरणे वाहतूक नियंत्रण शाखेतील आव्हाड साहेबांना देखील मी इन्व्हिटेशन दिले होते पण ड्युटी मुळे त्यांना येण्यासाठी उशीर झाला होता.आता पार्टी जवळपास संपली होती, माझे कुटूंबही घरी गेले होते आणि मी आव्हाड साहेब त्यांचे नवीन मित्र कांबळे आणि माझा जिगरी सुरज यांची बैठक त्याच हॉल मध्ये रंगली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि अचानक आव्हाड साहेबांनी विषय काढला, ते म्हणाले त्यांच्या खात्याला एखादा सामाजिक समरसतेचा कार्यक्रम करायचा आहे आणि तो त्यांना मी सुचवावा असे त्यांच्या साहेबांनी निरोप दिला आहे. अगदी त्याच वेळी पुन्हा मनाला विचलित करणार सकाळचं ते चित्र डोळ्यासमोर आलं. (खाऊ वाटताना तिथे पाळण्यात एक लहान बाळ झोपलं होतं त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा पातळ कपडा होता, आणि थंडीमुळे त्याच अंग कापत होतं) मी लगेचच म्हणालो, साहेब डोक्यात एक विचार सकाळपासून घुमतोय. त्यांनी मला विषय विचारला. तसा मी घडला प्रसंग त्यांना सविस्तर सांगितला. लगेचच ते दोघे म्हणाले आपण करूयात त्यांना मदत. पण माझ्या डोक्यात काही वेगळंच चाललं होतं. मी त्यांना म्हणालो…साहेब त्यांना आपण मदत करूच पण या काळात थंडीचा सगळ्यात जास्त त्रास प्राणी आणि गरीब माणसं जी बस्त्यात राहतात किंवा उघड्यावर झोपतात त्यांना होतो, मग आपल्याला चादर किंवा ब्लॅंकेट वाटून त्यांचा त्रास थोडा का होईना पण कमी येईल. त्यांना उपक्रम खूप आवडला.
मग आम्ही ठरवलं पुढच्या पंधरा एक दिवसात ब्लँकेट्स वाटपाचा कार्यक्रम करायचा. या वेळी ब्लॅंकेट/चादर किती लागतील, ते कुठून आणायचे यातलं काहीच डोक्यात नव्हतं. फक्त्त मनाला विचलीत करणार ते चित्र बदलायचं इतकंच ठरलेलं.

घरी येऊन आई आणि बायकोला माहिती दिल्यावर त्यांनाही हा उपक्रम खूप आवडला. त्यात निशूने (माझ्या बायकोने) सुचवलं जसा आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ वाटण्यासाठी, तो गोळा करताना व्हाट्सअप आणि फेसबुक चा उपयोग केला होता तसंच ब्लँकेट्स गोळा करण्यासाठी एखादी पोस्ट बनवता येईल. मला ही युक्ती मनापासून पटली, लगेचच ” चादर नव्हे तर माणुसकीच्या प्रेमाची ऊबच जणू ” अशी टॅगलाइन घेऊन एक मस्त पोस्ट तयार केली त्यात माझ्या मित्रांचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून नंबर देखील दिले आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड केली पोस्ट सोशिअल मीडिया वर. तसंच व्हाट्सअपचा एक ग्रुप बनवला त्याच नाव ठेवलं “प्रोजेक्ट वॉर्म विशेस” आणि विषेश म्हणजे माझ्या मित्रांना या पोस्ट माध्यमातून भांडूप, मुलूंड, ठाणे, ऐरोली,वाशी आणि घणसोली या भागातून अनेक कॉल देखील आले आणि जवळपास वीस दिवसात आम्ही सत्तर ब्लँकेट्स गोळा केले त्यातले काही नवीन तर काही जुने पण वापरण्यायोग्य असे होते.

आता कार्यक्रम करण्याचा दिवस ठरला, पण मला कार्यकमा आधी प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन संख्येचा अंदाज घ्यायचा होता. या कामात माझ्याबरोबर येण्यासाठी मी मित्रांना संपर्क साधला पण नोकरी आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांना वेळ नाही देता आला. मग मी स्वतः एकटेच जायचं ठरवलं. सकाळी अकरा वाजता ऐरोली मधून सर्वेक्षणाची सुरुवात केली आणि संध्याकाळी पाच वाजता वाशी ब्रीजखाली शेवट केला. माझा अक्खा दिवस या कामात गेला,पण या संपूर्ण दिवसात बस्तीतल्या अनेक कुटुंबासोबत बऱ्याच गप्पा मारायला भेटल्या, तसंच घणसोली ब्रीजखालील टोपल्या बनवून उदरर्निवाह करणाऱ्या कुटुंबाकडून सकारात्मक दृष्टीच्या जिद्दीची शिकवण भेटली. (तेच क्षण मी व्हिडिओ माध्यमातून नजरकैद केलेत)

विषेश म्हणजे दुपारचं जेवण मी अश्याच एका बस्तीतल्या कुटुंबासोबत केलं,व्वा काय ती चव ! त्या तेल भात चटणी आणि ठेच्याची नुसती आठवण झाली तरी तोंडाला पाणी सुटतं राव.
संध्याकाळी घरी आल्यावर व्हाट्सअप ग्रुप वर सगळ्या प्रतिनिधींकडून गोळा झालेल्या ब्लँकेट्स ची संख्या घेतली,ती होती सत्तर आणि आजच्या सर्वे नुसार कमीत कमी दीडशे ब्लँकेट्स हवेत असा अंदाज मी बांधला होता. एकीकडे मनात काळजी दाटली की कार्यक्रम अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलाय आणि अजून ऐंशी ब्लँकेट्स कमी आहेत तर दुसरीकडे तितकाच विश्वास होता की होईल व्यवस्था काहीतरी.

देव पण चांगल्या कार्यात आपल्या पाठीशी उभा असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला विशाल नावाचा माझ्या एका फेसबुकवरील मित्राचा फोन आला ज्याला मी आजवर कधी प्रत्यक्षात भेटतो नव्हतो, त्याने सांगितलं दादा तुझ्या पोस्ट नुसार मी वीस ब्लॅंकेट ऐरोली भागातून गोळा केलेत, ते ऐईकून इतकं बर वाटलं की सांगू नका. त्याच दिवशी दुपारी समीर नावाचा इगतपुरी इथून फोन आला, त्याने सांगितले या उपक्रमाला त्याला मदत करायची आहे पण तिकडे त्याचे रिसॉर्ट असल्याने इकडे येणे शक्य नाही म्हणून त्याने काही रक्कम माझ्या पेटीएम वर जमा केली. मी ती नकारायचा प्रयत्न केला पण त्याच्या आग्रहाखातीर मी ती घेतली. असेच दिवसा अखेर जवळपास तीस ब्लँकेट्स ची मदत जमा झाली आणि राहिलेले वीस ब्लँकेट्स वाहतूक नियंत्रण कक्षाने दिले. हुश्शश ठरवलेले त्याहून जास्त ब्लँकेट्स गोळा झालेत हे पाहून मी सुटकेचा श्वास टाकला.
ब्लँकेट्स गोळा करताना काही जणांनी मला उलट प्रश्न देखील केले की हे असं काम करून तू या लोकांना अजून दुबळे तर बनवत नाहीस ना!…तसा प्रश्न अजिबातच चुकीचा नव्हता पण दृष्टिकोनात फरक होता, कारण हा प्रोजेक्ट तर एक मार्ग होता या लोकांच्या जवळ जाण्याचा, माझा हेतू तर तसा फार मोठा आहे आणि तो गाठण्यासाठी आधी यांच्याशी ओळख करून घेणं खूप गरजेचं. तसंच ब्लॅंकेट माध्यमातून थोडा का होईना पण थंडीचा त्रास कमी व्हावा म्हणून हा उपक्रम.

आणि एकदाचा असा तो ब्लँकेटस वाटपाचा दिवस उजाडला, रात्रपाळीवरून आल्यामुळे मी जरा उशिराच उठलो, दुपारी डीमार्ट मध्ये जाऊन रक्कम स्वरूपात मदत केलेल्या मित्रांच्या वतीने ब्लँकेट्स विकत घेतले. बरोबर साडे चार वाजता विशालची गाडी इमारती खाली आली, मग माझ्या लालपरीवर (स्कुटी वर) मी आणि आरती, मधुरा तिच्या स्कुटी वर आणि विशाल सोबत प्रशांत चारचाकीतून अशी हम पांच टीम चादरी,ब्लँकेट्स घेऊन निघाली प्रोजेक्ट वॉर्म विशेश फत्ते करन्यासाठी. बरोबर पाच वाजता वाटप सुरु केल आणि रात्री आठ वाजता कार्यक्रम नियोजित ठिकाणी समाप्त झाला. या तीन तासात असंख्य चेहऱ्यावरची happywalifeeling अगदी जवळून अनुभवता आली आंम्हा सगळ्यांनाच.

आणि हो चांगल्या गोष्टी अगदी माडाच्या झाडासारख्या असतात कारण त्या झाडाला फळ येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, म्हणजे वेळोवेळी खत घालावं लागत, मुळाशी मीठ घालावं लागत, नियमित पाणी पाजावं लागतं आणि गरज पडलीचं तर त्याच्या झावळ्या देखील छाटाव्या लागतात पण एकदा का त्याला नारळ धराले की मग चिरकाळ आपल्याला त्याचं फळ नियमित स्वरूपात मिळत. असाच काही अनुभव म्हणजे आजवर मी बरेच सारे उपक्रम सातत्याने करत आलोय आणि लोकांपर्यंत ते पोहोचावेत म्हणून या सगळ्यांची माहिती सोसिअल मीडिया वर अपलोड करत आलो, तसं लोकांकडून तोंडभरून कौतुक आणि लाईकसही मिळत होत्याच पण माझ्या महेनतीच काहीसं यशस्वी फळ म्हणजे प्रोजेक्ट वॉर्म विशेश या माझ्या फेसबुक पोस्टने प्रेरित होऊन राहूल नावाच्या एका होतकरू मित्राने वज्रेश्वरी येथे त्याच्या मित्रांना हाताशी घेऊन बावन्न ब्लँकेट्स गोळा केले आणि पाराखाली/बस्तीत झोपणाऱ्या गरजूंमध्ये त्याचं यशस्वी वाटप संपन्न झालं.
हा त्यातलाच एक फोटो आहे.

विशेष आभार तुम्हां सगळ्यांचे ,ज्यांनी प्रोजेक्ट वॉर्म विशेस मध्ये आपल्या प्रेमळ माणुसकीच्या मदतीचा निःस्वार्थ हात पुढे केलात, या पुढेही ही साथ अशीच असू दयात.

शेवटी टॅगलाईन टाकायला कस बरं विसरू “निव्वळ ब्लँकेट्स माध्यमातूनपण असंख्य कुटुंबासोबत जोडले गेलो की राव.”

Now this is called “Thandi main Happy Wali Feeling ka Ehsaas”.

25 thoughts on “Project Warm Wishes

 1. छान
  चांगलं काम करतोय मित्रा
  शुभेच्छा…

 2. तुमचा पुढच्या वेळी असा उपक्रम असेल तर नक्कीच कळवा…आम्हालाही ह्यात सहभागी होऊन हॅपीवाली फिलिंग spread करायचे..

 3. Owsem work guys… Thodya feelings asaychyat mala pn kadhi pudhe yeun as kam kel nhvat. But now i only inspire from u guys… Love u guys. #happywalifeeling…

 4. Your work has always being a inspiration viju Dada. The work which you are doing motivates each and everyone. Helping the needy is a worship to God so you are indirectly serving your life to God. Keep doing such good things to serve our nation…#happywalifeeling

 5. Your work has always being a inspiration for us. Helping the needy is like a worship to God so you are indirectly serving your life to God. Keep doing such great things such that we get motivated……… #happywalifeeling

 6. विजय भावा, तू हाती घेतलेलं हे काम फारचं चांगलं आहे.
  मला आणि तुझ्या इतर असंख्य followers ना तुझा मनापासून अभिमान आहे. तुझे कार्य अजून वाढून लाभणारे आशिर्वाद असंख्य गुणित होवोत.

  शुभेच्छा!!!!!

  YatishG

 7. विजयराव तुमच्या सारखा माणूस न होणे
  कुठून सुचतं राव
  तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा

 8. मनापासुन खूप आनंद होतोय कि तुमच्या मनातली happy wali feeling आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू लागली आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती पोचण्यासाठी बरेच सारे मदतीचे हाथ पुढे सरसावू लागले आहेत. बाप्पा करो ही feeling अशीच निरंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझी साथ तुमच्या बरोबर नेहमीच असेल.
  So Keep on Smiling & spread ur Happywali feeling 🙂
  Luv u:-)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top