My Stories

बॅलन्स

तसं तर वर्षातून दोन उनाड पिकनिक माझ्या कॉलेज मित्रांसोबत ठरलेल्याचं, कारण सोमैयेट्स ग्रुपची पिकनिक म्हणजे #बे_लगाम मज्जा. पण या वेळचा पिकनिक बेत फारच खास होता, कारण पुढच्याच महिन्यात आमच्या ग्रुप मधला सिंगल बकरा सिद्धेया कटनार, मग त्याची बॅचलर्स पार्टी आणि त्यात आजच्याच दिवशी आमचा पत्रकार मित्र अमोल याचा वाढदिवस, म्हणजे यंदाची पिकनिक बऱ्याच सुखद आठवणी देणार हे तर नक्कीच होत..ठरवल्याप्रमाणे खास हिवाळी अधिवेशन सहल जुन्नर च्या दिशेने गणपती बाप्पा मोरया म्हणत निघाली. माळशेज घाट, आळेफाटा करत आमची स्वारी थेट शिवनेरी गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचली.

माझ्या राजांचे जन्मस्थान म्हटल्यावर शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व हे तसे फारच मोठे, तसा तर या आधीही मी शिवनेरी मोहीम दोनदा केली होती पण या वेळची शिवनेरी भेट काही निराळीच…नक्की हे निराळपण काय ! हेच सांगण्यासाठी हा लेख लिहितो आहे.

गडाची पहिली पायरी चढली आणि मित्रांसोबत सेल्फी घेत होतो तेव्हा दोन तीन पायऱ्या सोडून मुलांचा घोळका दिसला, ते ही फोटोच काढत होते. आमचा फोटो काढून झाला, फोटो कसा आला आहे ते पाहून आम्ही पुढे पायऱ्या चढायला सुरुवात केली. वर पहिले तर थोड्या वेळापूर्वी फोटो काढणारा ग्रुप फार पुढे गेला होता आणि पुढून उतरताना एक ग्रुप दिसत होता, गंमत म्हणजे त्या ग्रुपनेही थोड्या अंतरावर घोळका केला आणि सेल्फी शूट चालू केलं. आता मात्र ह्या घोळक्यातल्या फोटोशूटची भानगड काय आहे या बद्दल मला उत्सुकता लागली. मी थोड्या मोठ्या पावलांनी चढाई सुरु केली आणि दोनच मिनटात त्या ग्रुपला गाठलं. ते सगळॆ त्या घोळक्याच्या मध्य भागी असणाऱ्या व्यक्तींसोबत बोलत होते. टाचा उंच करून मध्ये नक्की कोण आहे हे पाहण्याची माझी धडपड चालू होती, तितक्यात त्यातल्या एकाला ” दादा सॅल्यूट तुम्हांला ” असं बोलताना मी ऐकलं. इतकं बोलून ते सगळे पायऱ्या उतरू लागले. आता मनात जास्तच उत्सुकता दाटली होती की इतकी सारी मंडळी कोणासोबत सेल्फी घेत होते आणि सॅल्यूट का बरे करत होते. डोक्यात हे विचार चालू असतानाच समोर माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिलं ते पाहून मी अगदीच थक्क झालो.
जवळपास माझ्याच वयाचे दोन अपंग तरुण आपल्या कोपरकाठ्यांच्या साहाय्याने सर सर गड चढाई करत होते. त्यांच्या सोबत लहान दोन मुलं आणि अजून एक मुलगा होता. त्यांना बघताच मनात एक वेगळ चैतन्य संचारलं. एका क्षणासाठी वाटलं या आधी दोनदा मोहीम केली खरी, पण यावेळी या दोघांच्या रूपात साक्षात मावळेच गडाच्या दिशेने सरसावतायत की काय!. मग मी देखील माझ्या मित्रांसोबत पुढील दोन मिनटात त्यांना गाठलं.

आम्ही दोन चार मिनटं त्यांच्या माघे निशब्द चाललो, पहिल्या दरवाजाजवळ त्यांनी थोडा विसावा घेतला. याच संधीचा फायदा घेऊन मी त्यांच्याशी संवाद साधला. मी त्या दादांना नाव विचारलं, त्यातले एक राहूल आणि दुसरे होते संतोष भाऊ. मग मी लगेच विचारलं ‘ दादा कुठून आलात? राहायला कुठे?’ ते म्हणाले “मुंबई”.
व्वा, मला इतका आनंद झाला की काही विचारू नका. बघा ना म्हणजे एकाच शहरात राहत असणाऱ्या अनोळखी माणसांची ओळख दुसऱ्याच एका शहरात व्हावी, तेही असं न ठरवता. आंम्ही पण मुंबईचेच असल्याचे त्यांना सांगितले. ते ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर देखील हसू उमटले. मग लगेच त्यांच्यासोबत आधीच्या दोन घोळक्यांसारखा आम्ही देखील ग्रूप सेल्फी काढला. माझे मित्र मग पुढे पायऱ्या चढू लागले पण माझे पाय मात्र पुढे निघत नव्हते. तरी माझा मित्र शैलेश म्हणालाच ‘ तू ये आरामात…माहित आहे तुला यांच्यासोबत बोलावस वाटत असेल, तुझा माणसं जोडायचा छंद आमच्यासाठी नवीन नाही,आम्ही जातो पुढे ‘. इतकं ऐकून मला खूप बरं वाटलं. कारण या दोन वाक्यात शैल्याने समजूतदारपणाने ग्रूप पिकनिक मध्येही थोड्या वेळासाठी का होईना, न मागता मला या दादांसोबत वेळ घालवण्यासाठी होकार दिला होता. मग त्या पाच जणांच्या ग्रूप मध्ये त्यांनी मला शामिल करून घेतलं. आधी ते दोघेही मला म्हणाले अरे आम्हांला चढायला वेळ लागेल तू हवं तर जा पुढे तुझ्या मित्रांसोबत. पण मग मी म्हणालो वेळ झाला तरी चालतंय की, इथे घाई कोणाला आहे! आणि हसतच आम्ही चढाई सुरु केली.

इथे नमुद करायला मला आनंद होतो कि अगदीच कमी वेळात आमची चांगलीच गट्टी जमली, आणि खूप साऱ्या गप्पा रंगल्या. त्यांच्याशी बोलताना मला कळाले कि त्यातील राहूलचे गाव आळेफाटा, हे सर्व त्याच्या घरी सुट्टी ची मजा घ्यायला मुबंई-सायन येथून आलेत आणि शिवनेरी मोहीम हा त्यांचा ठरवलेला बेत नव्हता, आज सहजच त्यांनी मोहीम केली..मनात आले आता या माध्यमातून माझी भेट यांच्याशी घडावी ही बहुधा श्रींचीच इच्छा.
मग बोलता बोलता त्यांना हे अपंगत्व पोलिओमुळे अगदी लहानपणापासून असल्याचे कळले, त्यातील संतोष दादा अगदी सहजच चढाई करत होते पण राहूल दादांना पोलिओ सोबत पाठीच्या असंतुलनाचा त्रास होता त्यामुळे त्यांना वेळो वेळी आधार लागत होता. पण त्यांच्याबरोबर पायऱ्या चढताना थकवा हा अजिबातच जाणवत नव्हता आणि वेळ अलगद फुलपाखरासारखा कसा उडून जात होता तेही कळत नव्हतं. थोड्या थोडया अंतरावर छोटीशी विश्रांती घेत आम्ही चढण चढत होतो आणि सोबत गप्पा देखील चालू होत्या. मी त्यांना विचारलं जशी आपली ओळख आज झाली तशी तुम्हां दोघांची ओळख केव्हा पासून आहे. यावर संतोष दादांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले आम्ही एकदम लंगोटी यार शाळेपासूनचे.आमच्या दोघांचे एकमेकांसोबत खूप मस्त पटते, त्यात गंम्मत म्हणजे माझं आडनाव लोंडे आणि आणि याच कोंडे, बघ याबाबतीत पण पटतंय आमचं. हे ऐकून आम्ही सगळेच खदखदून हसलो.
अश्याच छान गप्पा गोष्टी हसी मजाक करत आम्ही जवळपास दीड एक तासात आई शिवाई देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. पण आता संध्याकाळ जवळ आले याची मला काळजी वाटू लागली होती, कारण जर अंधार पडला तर पायऱ्या उतरताना त्रास होईल याची मला पूर्ण जाणीव होती. माझ्या मनात आले की दादांना सांगावे की अजून वर चढाई न करता आपण इथेच थोडा वेळ थांबून पायऱ्या उतरायला सुरुवात करावी, म्हणजे उजेडाचे आपण पायथ्याला पोहोचू. पण त्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या त्या चैतन्यमय इच्छाशक्ती समोर मी काही बोलूच नाही शकलो. पण म्हणतात ना नशीब, आम्ही दर्शन घेताना नेमके भडजी म्हणाले बाळांनो अंधार हल्ली लवकर पडतो तुम्ही लवकरच पायऱ्या उतरायला हवे. आणि त्यांचे म्हणणे दादांना पटले. मग आम्ही पायऱ्या उतरायचे ठरवले, पण नेमके त्याचवेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या लहान दोन मुलांना मंदिरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या लेणी पाहायच्या होत्या. मग ती दोन छोटी मुलं आणि त्या दोन्ही दादांचा मित्र त्याचेही नाव राहुलच, ते तिघे लेणी मार्गाकडे गेले आणि आम्ही त्यांना सांगितले की आम्ही हळू हळू पायऱ्या उतरायला सुरुवात करतो.आता आमचा ग्रूप पण दोन हिस्श्यात दुभंगला.
त्यामुळे माझी जबाबदारी थोडी वाढली होती. राहूल दादाला चढाई करताना दोन्ही बाजूला मी आणि दुसऱ्या राहुलने पकडले होते, पण आता थोड्या वेळासाठी मी एकटाच होतो त्यांना सहारा द्यायला.
जवळपास पंधरा मिनटं आम्ही चाललो असेल तितक्यात बच्चा पार्टी परत आली लेणी बघून. तसा तर राहूल दादाचा हात अगदी पायऱ्या चढतानापासून मी पकडलेला, पण आता एका वळणावर राहुलचा थोडा तोल गेला आणि तो घाबरून ओरडला बॅलन्स… बॅलन्स…बॅलन्स. तसा चटकन मी त्यांच्या कमरेत हात घालून आधार दिला.. पण ते थोडे घाबरलेले. मनात विचार आला वातावरन थोडे गंभीर झाले आहे, काही तरी केले पाहिजे सगळ्यांना हसवण्यासाठी.
मग मी मुद्दामच खिशातला मोबाईल हातात घेऊन म्हणालो अरे आहे की बॅलन्स माझ्या मोबाईल मध्ये. तुझा संपलाय का? तसा तो म्हणाला नाही..मग मी लगेच उद्गारलो…नाही आता तुम्ही बॅलन्स बॅलन्स ओरडलात म्हणून विचारलं…आणि या विनोदावर सगळेच निखळ हसलो आणि पायथ्याचा दिशेने चालू लागलो. बापरे खाली उतरेपर्यंत ‘बॅलन्स… बॅलन्स’ हा जोक सगळ्यांनी चांगलाच उचलून धरला आणि त्यावर आनंदी होऊन खूप जास्त सगळे हसत देखील होतो.

तसे उतरताना इतका विषेश त्रास होत नव्हता, या वेळात मनात थोडी घालमेल होत होती की माझ्या मनातलं यांना विचारू की नको ! पण मग थोडी हिम्मंत करून विचारलाच. मी त्यांना म्हणालो दादा राग मानू नका, पण रोजच्या तुमच्या जीवनात काही गोष्टी करत असताना किंवा प्रवास करत असताना या अपंगत्वामुळे काही विषेश अडचणींना समोर जावं लागतं का? माझ्या या प्रश्नावर त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून माझ्या मनात प्रत्येक अपंग व्यक्तीसाठी एक वेगळीच जागा बनून गेले. ते दोघेही अगदीच सहज म्हणाले यात राग मानण्यासारखे काय तेव्हा! अगदी खरं सांगायचं झालं तर या दोन कोपर काठ्यांना पाहून समोरच्याला आमच्याकडे पाहून थोडं अवघडल्या सारखं होतं. पण आम्हांला लहानपणापासून असं चालण्याची सवय झालेली असते मग त्यात काही अवघड असं अजिबातच वाटत नाही आणि प्रवासात आता खास डब्बे किंवा आसन आरक्षित तर असतातच. हा आता राहिला प्रश्न मित्र किंवा सोबतीची त्यात काय कुटूंब असतंच सोबत नेहमी आणि तुझ्यासारख्या माणसांची मित्र रूपात देव भेट घडवून देतो अधून मधून.

मग मी म्हणालो, मला #बे_लगाम व्हिडिओ काढायची सवय आहे आणि त्यात तुम्ही आता तर माझे मित्र झालात तर तुमच्यासोबत एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे. पहिल्यांदा तर ते म्हणाले अरे आम्हाला चांगलं बोलता नाही येणार, त्यावर मी त्यांना विश्वास दिला अरे दादा तुम्ही गेल्या काही तासात तुमच्या बोलण्यातून जो काही सकारत्मक राहण्याचा कानमंत्र दिलात तो चांगल्या माणसाला पण नाही जमणार. मी काही विचारेन त्याच फक्त्त उत्तर दया मग तर झालं. तसा त्यांनाही आत्मविश्वास आला आणि त्यांनी होकार दिला ( हाच तो व्हिडिओ )
या व्हिडिओ मार्फत या दोन्ही दादांनी आपल्या सगळ्यांना लसीकरणाबद्दकच्या जागृकतेचा आणि मुलांच्या योग्य संगोपनाचा खूप चांगला संदेश दिला.

हो एक मुद्दा तर नमूद करायचा राहूनच गेला, या तीन चार तासात दादांसोबत वेळ घालवत असताना, लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेला ‘घोळक्यातला फोटो शूट’ मला जवळपास चाळीस ते पन्नास वेळा अनुभवता आला ते ही वेगवेगळ्या ग्रूप सोबत. बऱ्याच ग्रुपना तर मी या दादांचा जवळचा मित्र किंवा नातेवाईक आहे असं वाटत होतं कारण इतक्या कमी वेळात त्यांनी मला अगदीच आपलंस केलं होतं. किल्ला उतरल्यावर माझी ही नवीन मित्र मंडळी त्यांच्या गाडीतून आळेफाट्याला रवाना झाली, निघण्या आधी आंम्ही एकमेकांचे कॉन्टॅक्ट घेतले आणि मी माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत पुन्हा पिकनिक सुरु केली. पण आमची ही ग्रेट भेट खूप निराळी होती…हो खूपच जास्त…

तुम्हांला सांगायचे तात्पर्य, एकीकडे हात पाय धडधाकट असणारे आजचे तरुण बऱ्याच गोष्टीत आळस करतात तर दुसरीकडे यांच्यासारखे मावळे अपंग असून देखील जिद्दीने माझ्या राजांचा इतिहास जवळून पाहण्यासाठी हसत हसत गड सर करतात…खरंच दादा ग्रँड सॅल्यूट तुम्हां दोघांच्या आणि तमाम अश्या अपंग बंधू भगिनींच्या जिद्दीला…तुमचं कौतूक कराव तितकं कमीच आहे..

शेवटी टॅगलाईन टाकायला कसा बरं विसरेन ” बॅलन्स च्या माध्यमातून देखील जोडलो गेलो राव”

Don’t miss on Polio doses for a child, and let us all spread a healthy and lifefull of Happy wali feeling to all…

13 thoughts on “बॅलन्स

 1. khare tar mitra tujhy sarkha Parsons hay jagat bhetne and asne hicha mothi gost ahe. tu jay prakare friendly rahilas itka helpfully ase koopcha kami kartat bt aamhi handicap ahet manhun only helping nature na show karta ulat aamchy lifestyle badal janun ghetlase. fakt eka bheti madhe tu eka khas friend sarkha vatu laglas. ulat tujhysarkha friend amhi milavala tya eka trip madhe and tyasathi really me tula thanks bolel.

 2. दोस्त दोस्त आणी + दोस्त हा बेलन्स तुज़्यात आहे, very good

 3. Khup Chan enjoy karta tumhi life .routine life sarvach jgatat.pan tumhi agdi lahan lahan gostitun aanand kasa milavta yeil tey pahata .nehmi apalya ajubajula ase kahitri ghadat aste .pan tya kade apan sahaj ritya durlksha karto.pan tumcha drushtikon jara hatke ahe..hats off to you.

 4. खुप छान भाऊ खुप कही आहे शिकण्या सारख आहे त्यांच्या कडून आणि स्पेशली तुज्या कडून

 5. Vijay superb. छोट्या गोष्टीतून मोठा आनंद. मज्जा आली वाचताना. पण इतकी गुंग झाली कि माझे स्टेशन आलेले कळलेच नाही. माणसं जमवायला शिकवतो आहेस तुझ्या लेखणीतून.

 6. तुझा छंद आणि तुझी उत्सुकता यांनी काही दैवयोगानेच लोंडे-कोंडे यांच्याशी भेट घडवून आणली असेल. त्यांची ही जिद्द कौतुकास्पद आहेच आणि त्यांनी जगाला दिलेला संदेशसुद्धा फार अनमोल आहे. तुझ्या रूपाने त्यांना मिळालेली तास दिडतासाची सोबत आणि निर्माण झालेला आपलेपणा हा आयुष्यातील सुखद आठवणींचा ठेवा होतो आणि आयुष्यातील पुढच्या वाटचालीकरताही मदतगार होतो. तुझी tagline पण छान आहे.
  आणि आपल्या नव्या मित्रांना मना पासून Salute.

  -YatishG

 7. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे,आम्हास यात कसे जोडून घेता येयील

  संजय -९८३३०३२७७४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top