My Stories

दिवाळी फराळ

दिवाळी आणि रामाचा पाडा एक वेगळंच नातं.
मी आणि माझे मित्र गेल्या बारा वर्षांपासून आदिवासी पाड्यांच्या विकासाचे निरंतर कार्य करतो आहोत, रामाचा पाडा हा त्यापैकीच एक प्रकल्प.

दर वर्षी ठरल्या प्रमाणे भांडूपच्या चाळी चाळी पिंजून काढायच्या घरा घरातून फराळ गोळा करायचा आणि मग तो एकत्र करून त्याचे समान भाग बांधायचे आणि ऐन दिवाळीच्या दिवशी पाड्यावर रवाना व्हायचे हे समीकरण ठरलेलं..

मी कॉलेजला असल्या पासून या उपक्रमाला सुरवात झाली आणि आत्ता माझ लग्न झालंय मला तीन वर्षांचा मुलगा आहे तरी असं वाटतं ही सुरवात जणू काल पर्वाचीच गोष्ट आहे. वेळ असा पळतो की काही कळतच नाही. आता तुम्ही म्हणाल पाड्याचा विषय आणि त्यात वेळेच गणित का मध्ये आणतोय!. मला इथे सांगायल आवडेल की दिवाळी फराळ हा विषय कॉलेज ते आज या वेळेत करताना मी नक्की काय कमावलं, तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप सारी माणसं. पहिल्या वर्षी जेव्हा हा उपक्रम चालू केला तेव्हा सगळीच माणसं अनोळखी मग प्रत्येक चाळीत जाऊन उपक्रमा विषयी माहिती देणे, त्यांना विश्वासात घेणं,पत्रक वाटणं या सगळ्या गोष्टी करताना खूप सारे चांगले वाईट अनुभव आले.
रोपट्याचं झाड व्हायला वेळ लागतोच, आणि हा प्रवास गाठताना त्याला बऱ्याच साऱ्या प्रसांगातुन वाढावं लागतं. उदाहणार्थ ऊन पाऊस वारा आणि अगदीच वाईट परिस्थिती आली तर वणवा / वादळ इत्यादी. पण या परिस्थितीत कळत नकळत आपोआप काळजीचे हात पुढे सरसावले की त्याची मुळ घट्ट होतं जातात. अगदी तसंच या उपक्रमात गेल्या काही वर्षात कळत नकळत असंख्य मदतीचे हात जोडले गेले आणि हा उपक्रम वर्षा नु वर्षे अधिक जास्त सफल होऊ लागला..

अगदी सुरवातीच्या काही वर्षात सगळ्यात मोठी मुश्किल होती ती लोकांची विचारसरणी. उपक्रम तर चांगला आहे, मदत तर करायचे पण फराळाचा प्रसाद देवाला न ठेवता असा कोणालातरी असा कसा बरे द्यायचा ? असा प्रश्न बऱ्याच कुटुंबातून यायचा आणि यावर आमचे एकच उत्तर असायचे आहो तुमचा हा फराळ घरात राहणाऱ्या खऱ्या खुऱ्या देवाच्या मुखात जाईल, आणि संत मंडळी सांगून गेलेत खरा देव माणसातच दडलाय. हे सांगणं पटायला थोडा वेळ लागला खरा पण चांगल्या गोष्टी लोकांना रुचतातच आणि याचा साक्षात्कार म्हणजे आता आम्ही जेव्हा फराळ गोळा करायला जातो तेव्हा नं विसरता लोकांनी तो आधीच बांधून ठेवलेला असतो. आणि विषेश म्हणजे जे चेहरे काही वर्षांपूर्वी आमच्यासाठी अनोळखी होते आज तेच चेहरे आम्हाला नावाने ओळखतात.

हे तर झालं माणसं जोडण्या बद्दल आणि बदलेल्या विचारसरणी बद्दल पण दिवाळी फराळ या उपक्रम माध्यमातून सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात मी कमावली ते म्हणजे हक्काचे कुटुंब जे कसारा येथील रामाच्या पाड्यावर वास्तव्य करतंय. हो बरोबर वाचलंत, हा अक्ख्या पाडा एक कुटुंबच होऊन गेलाय आणि अगदी अंतर्मनापासून सांगतो माझ्या जीवनातला हा एक अविभाज्य घटक झालाय जो आता कधीच या जगण्यातून वेगळा होऊ शकत नाही. आणि जी कुटूंबरूपी भेटीची उत्सुकता आमच्या मनात आहे तीच उत्सुकता आम्हाला पाड्यावरच्या प्रत्येक सदस्याच्या डोळ्यात दिसते. या पलीकडे आयुष्यात अजून दुसरं काय हवं !

मग हा उपक्रम हाताळताना त्यात अनेक लहान मोठे घटक येतात जसे की फराळ बांधा बांधी करायच्या रात्रीची धमाल. दर वर्षी ट्रेन मध्ये ऐन गर्दीतच गाण्यांचा रंगणारा डाव. लहान मुलांसोबत खेळात दंगून जाणारा वेळ, माझ्या साठी विचारलं तर एक दिवस पाड्यावरच्या शेळ्या, कोंबड्या, कुत्र्यांच्या मस्तीत उनाड लुटलेला आनंद, आणि महत्वाचं म्हणजे फराळ पाड्यावरील मंडळींना पोहोच झाल्यावर खऱ्या खुऱ्या सणाची पाणावलेल्या डोळ्यांनी आनंदात दिलेली जणू पोचपावतीच.

मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आम्ही हे उपक्रम स्वबळावर करत असून अजून आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाचा किंवा संगठनेचा हस्तक्षेप आम्ही या कार्यात करून घेतला नाही. अभय जगताप सरांच्या नेतृर्त्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हे कार्य भारतमाता सेवा प्रतिष्टान या नावे नोंदणीकृत केले.
अजयजी, सचिन, राम, संदेश, निरंजन, गणेश, निलम, डॉ.महेंद्र, प्रशांत या सर्व मित्रपरिवाराचा या कार्यात मोलाचा वाटा आहे ( एखादे नाव चुकून राहिले असल्यास माफी असावी.)

बऱ्याच वेळेस दिवाळी फराळ गोळा करताना पैसे रुपी देणगीचा किंवा दुकानातील पदार्थांचा देखील सहभाग व्हावा अशी काहींची मागणी आली पण आमचा अट्टाहास हा घरगुती फराळाचाच होता आणि आहे. कारण या उपक्रमाचा हेतूच ‘आपल्या घासातला घास पाड्यावरील बंधू बघिणींना वाटणे हा आहे.’ आणि हा हेतू साध्य करताना अप्रत्यक्ष रित्या कित्येक कुटुंब जे आम्हाला फराळ देत आहेत ते या सामाजिक जबाबदारीला जोडले जात आहेत हे विसरून कसं बरं चालेल !

दिवाळी फराळ हा आमचा एकच उपक्रम नसून पाड्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण,रोजगार या विषयांवर अनेक सारे उपक्रम वर्षभर इथे राबवले जातात आणि या सगळ्या उपक्रमातून या आधी देखील आम्ही दोन आदिवासी पाडे यशस्वी रित्या पूर्णतः विकसित केलेत तिथल्या प्रत्येक कुटुंबाला स्वतः च्या पायावर उभ राहायचं बळ दिलंय. आणि हा आमचा तिसरा प्रयत्न ध्येयाच्या अगदी जवळच आहे.

अगदी शेवटी दिवाळी फराळाबद्दल आवर्जून इतकंच सांगेन की लिहण्यासारखे असे या निगडित बरेच सारे प्रसंग आहेत. पण खऱ्या अर्थाने दिवाळी फराळ हा एक ‘अनुभव’ आहे आणि याचा साक्षत्कार जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा जिवंत अनुभव तुम्ही देखील नक्की एकदा आमच्या सोबत जगून पहा.

No other thing brings more happy wali feeling than helping someone.

13 thoughts on “दिवाळी फराळ

 1. आदिवासी पाड्यात जाऊन वाटप करणे हे खुप मोठं काम आहे त्यातून मिळणारा आनंद तेवढाच मोठा आहे…सलाम तुमच्या कामाला असेच काम करत रहा

 2. Khup chan abhipray aahe vanvashi bandhvanbaddal ashich sobat rahudya shevat paryant ajun khupkahi karaychay aaplyala pan tya aadhi aaplyala swatachi olakh tar dakhvaychi pan vanvashi bandhvanbaddal suddha tyanchya adchanin var solution kadhaychay sarvana ek vinanti vijay dada mhanje aamchya kutumbatil ek bhag aahe tyanchya vicharancha ullekh aamchya sathi sonyacha vaata aahe tyanche je karya aahe te khup chan aahe mitrano tumhala ek vinati tumhi dada sobat ashacha vanvashi vibhagat jaaun tya bandhvanchi madat kara madat mhanje aatachya kalat help ha shabda jaasta ullekh kela,jato , dhanyavaad phudchi bhet dadachya navin vicharat namskar

 3. तुझ्या गोड स्वभावामुळे आणि मस्तीखोरपणामुळे सगळंच भारी होऊन जातं आणि तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळतं…आमचं नशीब थोर की, तुमच्यासारखी मायेची माणसं मिळाली…keep it up..आम्ही आहोतच कायम सोबत 🙂

 4. पाड्यावरची आपली दिवाळी… ती देशभक्तीची गाणी, तो लंगडीचा खेळ, मामाचं पत्र हरवलं आणि बरंच काही, या सर्व गोष्टींसाठी वर्षभर चातकासारखी आपण वाट पाहतो, पाड्यावरून घरी परतल्यावर हिरमुसून जाणारा मी या लेखाने मला पुन्हा पाड्यावर नेले. खूप मस्त विजूदादा… अजून मस्त मस्त लिही.

 5. विजय भावा, असं फक्त ऐकून होतो . . . .
  हे मला जाम filmi वाटायचं. . . . .
  असं कोणी पदराचा वेळ काढून करतो, आणि अशा असीम कष्टांनी कोणा ईतर लोकांसाठी राबतो . . . . आणि त्यात कोणताही राजकीय / आर्थिक हेतू नसावा हे फारचं दुर्मिळ आहे. . . . .
  आणि तुमची team स्वबळावर हे सगळं करते आहे हे जाणून तुमचा फार फार अभिमान वाटतो. . . . . कुठून येतं हे स्फुरण! काय कमालीचा पिंड आहे तुम्हा सर्व group members चा!

  भावा तुला आणि भारतमाता सेवा प्रतिष्ठान यांना माझा मानाचा मुजरा!!!

 6. दुसऱ्याच्या आनंदा मध्ये आपला आनंद कसा शोधावा हे तुमच्या कडून शिकावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top