My Stories

फॅमिली मेंबर

एका बाजूला समाधान आहे तर दुसऱ्या बाजूला दुःख. समाधान याच कि तीन जीवांचे प्राण वाचवले आणि दुःख याच कि एका जीवाला वाचऊ शकलो नाही.

तारीख दि. ३१.०८.२०१८ वेळ रात्री ११:३० वाजता….
कार्यालयात महिनाअखेर च्या कामात व्यस्थ असताना अचानक फोन वाजला, नंबर संपर्क यादीत असल्याने मोबाईल स्क्रीन वर नाव आलं, ते होते माझ्या शाळेतल्या मित्राचे – “मयूर घाडिगावकर”. शाळा संपून इतकी वर्ष उलटली पण आमची कधीच भेट नाही. दोन वर्षा आगोदर ” दहावी ब ” असा व्हाट्सअप ग्रुप बनवून सगळ्यांचा एकत्रीकरणाचा बेत झालेला, काही कारणामुळे मला त्या एकत्रीकरणात सामील होता आले नव्हते. पण तेव्हा सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने काँटॅक्टस मध्ये ऍड करून ठेवलेले, तेव्हाच मयूर माझ्या संपर्क यादीत जोडला गेला आणि आज दोन वर्षाने त्याचा मला फोन करण्याचा योग आला…

मी : बोल मयूर
मयूर : अरे तुझ्याकडे माझा नंबरा आधी पासून आहे ?
मला वाटलं मला आधी तुला ओळख करून दयावी लागेल स्वतःची.
मी : तुझा नंबर कॉन्टॅक्ट मध्ये सेव आहे..बोल मित्रा.
मयूर : अरे एक मदत हवी होती.
मी : बोल ना भाई , काय काम आहे?
मयूर : अरे फेसबुक वर प्राण्यांसंबंधी बऱ्याच पोस्ट वाचलेत मी तुझ्या..मी मानखुर्द मध्ये राहतो…
एखादा प्राणी मदत संबंधित NGO चा नंबर दे…गरज आहे.
मी : नक्की काय झालंय ? कारण या वेळी NGO शी कॉन्टॅक्ट होणं मुश्किल आहे..

त्याने सांगितलं त्याच्या इमारतीत तळमजल्यावरच्या रूम मागे एक ससा खिडकी खाली जखमी अवस्थेत पडला आहे. मला काही कळेना की मुंबईच्या गजबजलेल्या वस्तीत ससा कसा आणि कुठून बरे आला असेल?
मी काही विचारण्या आधीच तो म्हणाला तो ज्या रूमच्या खिडकी खाली आहे, त्यांनीच तो पाळला होता. पण त्यांना त्या जखमी सश्याची काहीच पडली नाहीये…आता जास्त बोलण्यात मला वेळ घालवायचा नव्हता कारण त्या जखमी सश्याचा जीव खूप महत्वाचा होता माझ्यासाठी.
मी म्हणालो थांब मी बघतो कुठून काही मदत मिळते का ते?
मला माहित होते इतक्या रात्री उशीरा कोणत्याही संस्थेची मदत मिळणे तसे अवघड आहे पण तरी त्याचा फोन ठेऊन मी एक दोन NGO तसेच बृहनमुंबई महानगरपालिकेचा प्राणी मदतीसाठीचा फ्री हेल्पलाईन नंबर लाऊ पाहिला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मुंबई सारख्या विकसित शहरात देखील उशीरा रात्री प्राणी बचावासाठी फारच कमी पर्याय आहेत, ही आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल…

काही तरी केलंच पाहिजे त्या मुक्या जीवासाठी, पण नक्की काय…काहीच सुचेना..क्षणभरासाठी डोकं अगदी सुन्न झालं…डोक्यात आलं सुरजला फोन करावा (माझा जिगरी मित्र), तो घरी असेल, काही तरी मार्ग निघेल.अगदी प्रामाणिक सांगतोय तेव्हा सुरजलाच फोन करावा, हे मला का सुचले ते मला नाही कळाले. पण माझा सुरज ला फोन करण्याचा निर्णय एकशे एक टक्के बरोबर होता…
सूरज झोपायच्या तयारीत असताना माझा कॉल त्याला गेला, घडलेला सारा प्रकार मी त्याला सांगितला.त्याने सांगितले त्याचा प्रशांत नावाचा एक प्राणी मित्र वाशी मध्ये राहतो, त्याच्यासोबत मानखुर्द ला जाण्याची त्याने तयारी दाखवली. मग मी लगेचच त्याला मयूर चा नंबर दिला..

थोड्या वेळात समोरूनच मयूरचा फोन आला..अरे तो श्वास घेत नाहीये, बहुतेक गेला रे तो..मला काय करावं काहीच सुचेना. मी म्हणालो नाही अरे सरळ बघ…थांब मी विडिओ कॉल करतो असे म्हणून मी व्हाट्सअप वरून विडिओ कॉल जोडला. त्या मुक्या जीवाने देह त्यागला होता.
एका सेकंदात पाया खालची जमीन एकदम सरकली..मन आतून अगदीच डब डबल..फोन हातात तसाच चालू होता पण तोंडून आता शब्द निघत नव्हते..
पुढून मयूरचा दोनदा आवाज आला विजय…अरे विजय…
मी म्हणालो…सॉरी यार नाही वाचवू शकलो आपण या मुक्या जीवाला..पुढून परत मयूरचा आवाज आला, विजय मला अजून खूप भीती वाटते. माझ्या मोबाईल मध्ये त्याचा घाबरलेला चेहरा आणि थरथरता आवाज अगदी साफ कळत होता. पण आता ही भिती नक्की कसली हे कळायला मार्ग नव्हता.
तरी मी त्याला विचारलंच..आता कसली रे भिती..तो म्हणाला, अरे त्यांच्या घरी अजून तीन ससे आहेत…हा ससा इथे कसा पोहोचला ते माहित नाही, पण आता बाकी तीन सश्यांची काळजी वाटते..
मी म्हणालो मिनिटाचाही वेळ वाया न घालवता पाहिला तू त्यांच्या घरी जा आणि बाकीचे ससे कसे आहेत ते बघ.

मी परत सूरजला फोन केला, ते अर्ध्या रस्त्यात पोहोचले होते. मी त्यांना जखमी ससा दगावल्याचे कळवले, पण तरी अजून तीन जीव तिथे धोक्यात असल्याची माहिती दिली.आत्ता फोन ची वाट बघण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता.
अर्ध्या तासात सुरजचा फोन आला पण तिकडून प्रशांत बोलत होता, तो म्हणाला भाऊ अरे खिडकीतून पडून दगावलेली सशीन पोटुशी होती रे,तिच्यासोबत तिच्या गर्भातील पिल्लं पण गेली. आता तर अगदीच गहिवरून आलं, पण दुसऱ्या बाजूला डोक्याचा संताप पण झाला. मनात विचार आला यांच्या मालकाचा इतका कसला निष्काळजीपणा.
परत मी काही बोलणार त्या आधीच त्याने फोन सूरजला दिला आणि त्याने सांगितले आम्ही हे बाकीचे तीन ससे घेऊन येतोय. त्यांनी स्वतःहून हे आम्हाला स्वाधीन केलेत.

सुरज बॅचलरस राहतो म्हणजे त्याच्याकडे सशे नाही ठेवता येणार, या सगळ्या प्रकारात
रात्रीचे १ वाजले होते. मी माझ्या घणसोली मध्ये राहणाऱ्या अजून एका मित्राला (गौरव) फोन लावला. तो ससे त्याच्याकडे उद्या पर्यंत ठेवायला तयार झाला. मग सुरज ने गौरव चा नंबर माझ्याकडून घेतला आणि रात्री १:३० वाजता ससे सुखरूप गौरव कडे पोहोचवले.

एका बाजूला दुःख होते एक प्राण गमावल्याचे तर दुसऱ्या बाजूला समाधान होते तीन जीव सुखरूप हाती लागल्याचे.
दुसऱ्या दिवशी दुपारी मी सश्यांना माझ्या राहत्या घरी आणले.
माझ्या बाळाने या तिघांसोबत लगेच गट्टी जमवली.

गंमतीने मी त्यांचं नाव इना, मीना, डिका असे ठेवले. विचार केला यांच्या अडॉप्शन साठीचा मॅसेज फेसबुक / व्हाट्सअप वर टाकावे आणि मोबाईल चा डाटा नेटवर्क चालू केले, तर व्हॅट्सऍप वर आधीच दोन इच्छुक अडॉप्शन मेसेज आले होते. सुरज ने सशाच्या रेस्क्यू चा मेसेज आज सकाळी काही ग्रुप वर पोस्ट केला होता तिथून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता.

त्यातला एक मेसेज ठाण्यात राहणाऱ्या मनमौजी विशाल दादाचा होता. मानगड मोहिमेत हल्लीच आमची ओळख झाली. पण मनाने अगदीच प्रेमळ अश्या विशाल दादाच्या अडॉप्शन साठी पुढे सरसवलेल्या हातांना पाहून म्हणालो चला सश्याना बापमाणूस भेटला. मी लगेचच त्याला फोन लावला आणि उद्या म्हणजे रविवारी रात्री ठाणे स्टेशनं ला सश्यांना घेऊन येतो असे सांगितले.

हॉटेल सुरुची मध्ये आमची ( म्हणजे मी, सुरज, विशाल आणि मयूर ) मस्त मिसळपाव पार्टी झाली. आणि नंतर मी त्या मुक्या जीवांना दादाकडे सुखरूप पोहोच केले. त्यांना हाताळताना विशाल दादा च्या डोळ्यातला लडिवाळ आनंद अगदी सहज जाणवत होता..

परवाच दादाचा मेसेज आला, या तिन फॅमिली मेंबर्स मुळे घरात सगळे खूप जास्त खूश आहेत…खास करून आईचा यांच्यावर चांगला जीव जडलाय. श्री कृष्णजन्माष्टमी दिवशी यांचं रीतसर नामकरण करणार आहोत…मनातच म्हणालो, मानखुर्द ते ठाणे असा प्रवास करून शेवटी सश्यांना एक हवे असे काळजी घेणारे कुटूंब भेटले, याहून जास्त सुखं काय असू शकते…

लेख लिहताना मनात आले की आपण नकळत प्राणी पाळणाऱ्या मंडळींबद्दल नकारात्मक विचार मांडतो आहोत की काय !
तसे मुळीच नाही. मला कळकळीने इतकेच सांगायचे आहे की प्राणी पळायचेच असतील तर त्यांची पोटच्या पोरासारखी काळजी घ्या…मुका असला तरी त्याचा पण जीवच आहे, त्यांना माणसासारखंच जपा…घराची शोभाच वाढवायची असेल तर बाजारात बऱ्याच शोभेच्या वस्तू उपलब्ध आहेत की…तुमच्या गमतीसाठी एखाद्याचा जीव पणाला लाऊ नका…बाकी सगळे समजण्या इतके आपण सुज्ञ आहोतच…

The little cute rabbits got new home and a family who would look after them, and that’s what we call a Happy Wali Feeling 😇

30 thoughts on “फॅमिली मेंबर

 1. विजय, भावा GREAT आहेस तू आणि तुझे मित्र!!
  आणि त्या मुक्या जीवांना adopt करणारे प्रेमळ विशाल दादा आणि त्यांची family.
  तुझी आणि तुझ्या मित्रांची प्राण्यांंबद्दलची कळकळ आणि तुमचे वास्तविक श्रमदान हे खूप मोलाचे आहे. नाहीतर style म्हणून प्राणिप्रेम दाखवणारे बरेच असतात. पण तुमच्यासारखे लाखातून ५-१० असतात.
  अभिमान आहे तुमचा.
  Great विजय simply great!!!!!!!!!!

 2. खुप उत्तम तुझे ब्लॉग्स वाचुन आनंदी होतो,
  Happywali feeling rocks

 3. खूप छान भावा, अभिमान वाटतो तुझा. केव्हा माझी मदत लागली तर सांग नक्की.

 4. खूप छान मित्रा. आपल्या जिवलग माणसांवर तर सर्वच प्रेम करतात पण तू तो अवलिया आहेस जो प्राण्यांवर ही तितकेच प्रेम करतो…. ही पहिली वेळ नाही, तुझ्या मुळे अश्या कित्येक मुक्या जिवांना नवीन जीवन मिळाले आहे. मला अभिमान वाटतो भावा तुझा… तुझे लिखाण तर दिवसेंदिवस उत्तम होत चालले आहे.. आवर्जून वाट पाहतोय तुझ्या पुढील दर्जेदार लेखाची

 5. खूप छान मित्रा. आपल्या जिवलग माणसांवर तर सर्वच प्रेम करतात पण तू तो अवलिया आहेस जो प्राण्यांवर ही तितकेच खरे प्रेम करतो. ही पहिली वेळ नाही, या आधी पण तुझ्या मुळे कित्येक मुक्या प्राण्यांना नवीन जीवन मिळाले आहे. मला अभिमान वाटतो भावा तुझा.. तुझे लिखाण तर दिवसेंदिवस उत्तम होत चालले आहे.. आवर्जून वाट पाहतोय तुझ्या पुढील दर्जेदार लेखाची

 6. खूपच सुंदर विजय, चांगलं काम करतोय भावा तू, माझी काही मदत लागली तर कळव.

 7. चांगले काम केले. चांगले कार्य करण्यासाठी देव तुला अधिक शक्ती देईल विजय…….

 8. Thanks for a marvelous posting! I definitely enjoyed reading it,
  you are a great author. I will make sure to bookmark your blog and will
  eventually come back at some point. I want to encourage continue your great work, have a
  nice day!

 9. Having read this I beliieved iit was extremely informative.

  I appreciate you taking the time and effort to put
  this information together. I once again find myself personally
  spending a significant amount of time both reading and posting comments.But so what, it was
  still worth it!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top