My Stories

अंजली

” ५० रूपयांची खेळनी आणि २० रुपयांच्या वडापाव नं लाखमोलाच हसु गालावर उमटलं‌….”
काल सकाळी मित्राने गांधीनगरला ड्रॉप केले, तीथुन बस स्टॉप कडे फूटपाथ वरुन जात असताना गर्दीत मला ” दादा ” नावाने हाक मारत असल्याचं जाणवलं. मी मागे वळून पाहिलं, निळ्या रंगाची कपडे घातलेली ५ ते ६ वर्षांची चिमुकली माझ्या जवळ येऊन म्हणाली – दादा ओळखलं का? तू मुलुंड स्टेशन ला भेटलेला… दिवाळी मध्ये मला फराळ आणि बाहुली दिलेली… थोडा ही विचार न करता मी उदगारलो ” अंजली “. ती लगेच म्हणाली हो दादा… मी लगेच विचारलं छोटू कुठे आहे? तिने सिग्नल जवळच्या पुटपाथ कडे बोट दाखवलं…. तिथे अंथरुणावर तो शांत पडलेला… ती म्हणाली छोटू आता मोठा झालाय… मी म्हणालो चल त्याच्या कडे जावू. जाताना गाडीवरचे दोन वडापाव घेतले… मला बघून तो खुश झाला आणि ताडकन उठून हाताकडे पाहू लागला…अंजलीने वडापाव खात मला ती डॉल दाखवली जी मी तिला मागच्या दिवाळी ला दिलेली. अर्थातच ती खूप मळलेली आणि फाटलेली होती पण तरी ती तिने जपून ठेवली, हे पाहून खूप बरं वाटलं…

देव पण चांगल्या गोष्टीत आपल्या बरोबर असतो याच उत्तम उदाहरण बघा… मला वाटत होते छोटू साठी काही तरी खेळणे घ्यायला हवे … पण जवळ सगळं इंडस्ट्रीयल एरिया, खेळण्यांचे दुकान नसते भेटले… तितक्यात खांद्यावर टांगलेली खेळणी विकणारा माणूस मला सिग्नलच्या पलीकडचा रास्ता क्रॉस करताना दिसला. छोट्या गाडीचा एक सेट मी विकत घेतला. ते खेळणं बघून छोटू ने उड्याचं मारायला सुरुवात केली..मग मी अंजली ला म्हणालो मला जायला हवं कामावर उशीर होईल.. उदया परत भेटू…काही न बोलता तिने माझा हात पकडला आणि म्हणाली चल दादा तुला मी बस स्टॉप वर सोडते…त्या वाक्यात इतकं आपलपण होत… क्षणभरासाठी वाटलं इतका कुठून समजूतदार पणा आला असेल ह्या चिमुकल्या डोक्यात… मनात नसताना मला तिथून निघावं लागलं..ती स्टॉप वर थांबली मी बस मध्ये चढलो आणि लास्ट सीट वरून मी तिला एक टक बघत होतो आणि बस दिशेणासी होईपर्यंत ती मला हात वर करून बाय करत होती, माझा निरोप घेत होती…

मित्रानो मुद्दाम हा प्रसंग शेअर करावा वाटला… कारण कोणास ठावूक तुमची एखादी छोटीशी भेट एखाद्या अनोळख्या गरजूचं लाख मोलाची हसू बनून जाईल…
Again Feel Happy Wali Feeling……..😊

10 thoughts on “अंजली

 1. विजय, भावा!!!!! शहराचं आला अंगावर!
  कित्ती प्रेम करतात यार लोकं तुझ्यावर . . . .
  आणि काय पाहिजे आयुष्यात.

 2. I do accept as true with all the ideas you have offered on your post.
  They are really convincing and will certainly work.
  Nonetheless, the posts are too short for starters.

  May just you please prolong them a bit from next time?
  Thank you for the post.

 3. Hello! This post couldn’t be written any better! Reading this post reminds me of
  my good old room mate! He always kept talking about this.

  I will forward this write-up to him. Fairly certain he will have a
  good read. Thanks for sharing!

 4. I drop a comment whenever I appreciate a post on a website or I have something to contribute to the discussion.
  It is caused by the sincerness displayed in the article I looked at.

  And on this post अंजली – Happy Wali Feeling.
  I was moved enough to leave a commenta response 😛 I do have 2
  questions for you if you don’t mind. Could
  it be only me or do a few of the responses look
  like they are written by brain dead people? 😛 And, if you are posting at other places,
  I would like to keep up with anything fresh you have to post.

  Would you list all of all your communal pages like your twitter feed, Facebook page or linkedin profile?

 5. I leave a comment when I especially enjoy a post on a site or if I have something to add
  to the conversation. Usually it’s a result of the
  passion communicated in the post I browsed. And after this article अंजली – Happy Wali Feeling.
  I was actually excited enough to post a commenta response 😉
  I actually do have a couple of questions for you if you usually do not
  mind. Could it be just me or does it look like a few of these responses
  appear like they are left by brain dead visitors? 😛 And, if
  you are posting at additional online social sites, I would like to follow you.
  Would you list all of your community sites like your Facebook page,
  twitter feed, or linkedin profile?

 6. Terrific work! That is the type of information that are supposed to be shared across the net.
  Shame on the search engines for now not positioning
  this publish upper! Come on over and visit my web site
  . Thank you =)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top